Shiv Parikrama : हार तुरे नको, मला फक्त तुमचे प्रेम जिव्हाळा महत्वाचा : पंकजाताई मुंडे

Shiv Parikrama : हार तुरे नको, मला फक्त तुमचे प्रेम जिव्हाळा महत्वाचा : पंकजाताई मुंडे
Published on
Updated on

जामखेड; पुढारी वृत्तसेवा : हार तुरे नको मला फक्त तुमचे प्रेम जिव्हाळा महत्वाचा असून तो कायम आहे याचा मला आनंद आहे. त्यामुळे उतणार नाही, मातणार नाही, घेतलेला वसा सोडणार नाही. असे यावेळी भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय महासचिव तथा माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी महाराष्ट्रात शिवशक्ती परिक्रमा यात्रा हाती घेतली आहे. ही यात्रा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून जात आहे. उद्या 9 सप्टेंबर 2023 रोजी ही यात्रा जामखेड तालुक्यात आली होती यावेळेस आमदार प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील जामखेड तालुका भाजपने पंकजात़ाई मुंडे यांच्या स्वागतावेळी बोलत होत्या.यावेळी भव्यदिव्य असे स्वागत यावेळी जामखेड भाजपच्या वतीने करण्यात आले.

यावेळी बोलताना पंकजाताई मुंडे म्हणाले की, तुम्ही माझी साथ सोडू नका मी कुणाच्या समोर झुकणार नाही त्यामुळे तूमची साथ कायम पाहिजे असे यावेळी म्हणाल्या , मी संपणारी नसून माझ्या मागे गोपीनाथ मुंडे ची शक्ती आहे .त्यामुळे कोणी संपणार असं म्हणत असेलतर तर त्यांचा तो गैरसमज असेल असे ही म्हणाले, श्रावण महिन्याचे औचित्य साधून शिव आणि शक्तीचे दर्शन घेण्यासाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे चार सप्टेंबरपासून राज्याचा दौर्‍यावर आहेत. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या देवस्थानांचे त्या दर्शन घेत आहेत.

त्याबरोबर या प्रवासात त्या ठिकठिकाणच्या स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. शिव-शक्ती परिक्रमा यात्रेमुळे भाजपा व मुंडे समर्थक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. सध्या ही यात्रा अंतिम टप्प्यात आहे. यात्रेचा समारोप 11 रोजी परळी येथील ज्योतिर्लिंग मंदिरात होणार आहे. तत्पूर्वी ही परिक्रमा यात्रा जामखेड तालुक्यातून गेली आहे. या यात्रेच्या स्वागतासाठी कार्यकर्ते मोठी गर्दी केली होती.

भाजपा नेत्या माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या स्वागतासाठी आमदार प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जामखेड भाजपने जंगी तयारी केली होती. पंकजाताई यांच्या स्वागतासाठी जामखेड शहरात ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या, . उद्या 9 रोजी पंकजाताई यांचे जामखेड येथे 5 च्या सुमारास आगमन झाले होते.

जामखेड येथील करमाळा चौक व खर्डा चौकात भाजपकडून पंकजाताई यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. आमदार प्रा राम शिंदे यांच्या वतीने खर्डा चौकात पंकजाताई मुंडे यांचे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले होते. यासाठी भव्य असा 22 फुटी फुलाचा हार तयार करण्यात आला होता. तसेच दहा जेसीबी मशिनद्वारे फुलांची उधळण केली जाणार आहे. भाजपने पंकजाताई यांच्या स्वागता करण्यात आले.

जामखेड शहरातील स्वागत स्वीकारून पंकजाताई खर्डा भागाकडे रवाना झाल्या . खर्डा भाजप व मुंडे समर्थकांकडून लोणी फाटा ते सिताराम गड अशी भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सिताराम गडावर दर्शन घेतल्यानंतर खर्डा बसस्थानक परिसरात नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर पंकजाताई यांच्या हस्ते नागोबाचीवाडी येथे उभारण्यात आलेल्या लोकनेते स्व गोपीनाथरावजी मुंडे प्रवेशद्वाराचे उद्घाटन करण्यात आहे. त्यानंतर पंकजाताई पाटोदा जि बीड कडे रवाना झाल्या.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news