

शाहूवाडी; आनंदा केसरे : शाहूवाडी तालुक्यात कोकरूड पुलावरून वारणा नदीत ट्रॅव्हल्स कोसळल्याची घटना आज (दि.९) सकाळी ८ वा. च्या सुमारास घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
आज सकाळी सातच्या सुमारास पावलो कंपनीची गोवा-मुंबई ट्रॅव्हल्स (एआर११ए७५६७) शाहूवाडी कराड मार्गे जात होती. शाहूवाडी- मलकापूर-अमेणी घाट मार्गे बस कोकरूड वारणा नदी पुलावर आली असता वळण रस्ता आणि भरधाव वेग यामुळे चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस नदीत कोसळली. बसमधून ४० प्रवाशी प्रवास करत होते.
हेही वाचा :