Kolhapur Accident News : वनरक्षक परीक्षा देऊन परतणाऱ्या बत्तीस शिराळ्याच्या तरुणाचा अपघातात मृत्यू

Kolhapur Accident News : वनरक्षक परीक्षा देऊन परतणाऱ्या बत्तीस शिराळ्याच्या तरुणाचा अपघातात मृत्यू
Published on
Updated on


किणी : खडतर परिस्थितीतून मार्ग काढत अधिकारी होण्याचे स्वप्न बघणाऱ्या तरुणावर काळाने घाला घातला. परीक्षा देऊन परतत असताना विकर्ण नंदकुमार मस्कर (वय २४, रा.बत्तीस शिराळा जि. सांगली) याचा किणी टोल नाक्याजवळ झालेल्या अपघातात मृत्यू झाला. ही घटना रविवारी घडली. यशाला गवसणी घालण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या विकर्णच्या अपघाती मृत्यूमुळे सर्वांनाच सुन्न करून टाकले. सर्वत्र शोककळा पसरली आहे. Kolhapur Accident News

याबाबत अधिक माहिती अशी की, बत्तीस शिराळा येथील विकर्ण मस्कर याने वडील हयात नसतानाही परिस्थितीवर मात करत बीएस्सी पदवी संपादन केली. बहिणीही पदवीधर झाल्या, सर्वांनाच स्पर्धा परीक्षेचा ध्यास लागला. जिद्दीने आणि चिकाटीने अभ्यास करत मोठ्या चार बहिणींपैकी एक बहीण निशा मस्कर शिक्षिका, तर एक बहीण उषा मस्कर पोलीस उपनिरीक्षक बनली. बहिणींच्या पावलावर पाऊल ठेवत आपणही स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्याच्या जिद्दीने अथक परिश्रम करत विकर्ण याने अभ्यास सुरू केला. Kolhapur Accident News

वनरक्षक परीक्षेत तो पास झाला. भावाच्या या यशाने चार बहिणींसह आईलाही अत्यानंद झाला. रविवारी सकाळी त्याची कोल्हापूर येथे शारीरिक चाचणी होती. यासाठी शिराळा येथून तो सकाळी मोटरसायकल (एमएच – १० सीई- ६६५७) ने कोल्हापूर येथे गेला.

उत्कृष्टरित्या त्याने परीक्षा दिली. याच आनंदात तो गावाकडे परतत असताना दैवाने घात केला. पुण्याकडे जाणाऱ्या चारचाकी मोटारीचा (एमएच -१३ -ईसी-३०६३) विकर्णच्या दुचाकीला धक्का लागला. त्याची सॅक मोटारीच्या आरश्याला अडकली आणि तो मोटरसायकलसह महामार्गावर कोसळला. त्याचे डोके रस्त्यावर जोराने आपटल्याने त्याच्या नाकातोंडातून रक्त वाहू लागले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विकर्णला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णवाहिकेतून कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मालवली. या अपघाताची नोंद रात्री उशिरापर्यंत वडगाव पोलीस ठाण्यात झाली नव्हती.

Kolhapur Accident News : हेल्मेट असते तर…

हेल्मेट सक्ती बाबत वारंवार पोलीस व महामार्ग प्रशासनाकडून प्रबोधन केले जाते. मात्र, याकडे दुर्लक्ष करत अनेक दुचाकीस्वार धोकादायकरित्या प्रवास करत असतात. विकर्ण मस्कर मोटरसायकलवरून कोसळताना त्याचे डोके रस्त्यावर आपटले. यात तो गंभीर जखमी झाला. त्याने जर हेल्मेट घातले असते, तर डोक्याला मार लागला नसता आणि त्याचा जीव वाचला असता.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news