ट्रक-दुचाकी अपघातात कोल्हापूरची महिला ठार | पुढारी

ट्रक-दुचाकी अपघातात कोल्हापूरची महिला ठार

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात कोल्हापुरातील महिला जागीच ठार झाली. उमा विश्वजित तेली (वय 46, रा. सोमेश्वर गल्ली, शुक्रवार पेठ) असे त्यांचे नाव आहे. मुलगा पारस विश्वजित तेली (21) हा जखमी झाला आहे. अंबप (ता. हातकणंगले) फाट्याजवळ रविवारी सकाळी ही घटना घडली.

मुलगा पारससमवेत उमा तेली दुचाकीवरून अंबप येथील शेताकडे जात होत्या. भरधाव जाणार्‍या ट्रकने पाठीमागून त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिल्याने उमा तेली रस्त्यावर कोसळल्या. डोक्याला व हाताला गंभीर इजा होऊन त्यांचा मृत्यू झाला. मुलगा पारसही जखमी झाला असून, त्यास शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे शुक्रवार पेठ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सीपीआर पोलिस चौकीमध्ये या घटनेची नोंद झाली आहे.

Back to top button