तुम्हीही बनावट पॅन कार्ड वापरत आहात का? या मार्गाने ओळखा तुमचं पॅनकार्ड फेक आहे की रिअल

तुम्हीही बनावट पॅन कार्ड वापरत आहात का? या मार्गाने ओळखा तुमचं पॅनकार्ड फेक आहे की रिअल
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन: गेल्या काही वर्षांत भारतासह संपूर्ण जगात डिजिटायझेशनचा वेग खूप वेगाने वाढला आहे. अशा परिस्थितीत देशात त्याच्याशी संबंधित फसवणुकीचे प्रमाणही अनेक पटींनी वाढले आहे. बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्ड बनवण्याची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. आपल्या सर्वांना माहित आहे की, आजच्या काळात सर्वात महत्वाचे कागदपत्रांपैकी एक म्हणजे पॅन कार्ड. त्याच्या वापराने, आपण जवळजवळ प्रत्येक आवश्यक काम अगदी सहजपणे करू शकतो. बँका, रुग्णालये, शाळा, महाविद्यालये इत्यादी सर्वत्र त्याची गरज आहे.

पण, आजकाल बनावट पॅनकार्डच्या वाढत्या घटनांमुळे आयकर विभागाने अनेक कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. बनावट पॅनकार्ड ओळखण्यासाठी आयकर विभागाने पॅनकार्डसोबत क्यूआर कोड जोडण्यास सुरुवात केली आहे. याच्या मदतीने क्यूआर कोडवरून खरे आणि बनावट पॅनकार्ड ओळखले जाऊ शकते. तुमच्या स्मार्टफोनद्वारे क्यूआर कोड स्कॅन करून तुम्ही पॅन कार्ड खरे आहे की बनावट हे शोधू शकता. यासाठी तुम्हाला आयकर विभागाच्या अॅपची मदत घ्यावी लागेल.

खालील दिलेल्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही खरे आणि बनावट पॅन कार्ड ओळखू शकता. खोटे आणि बनावट पॅन कार्ड शोधण्यासाठी, प्रथम तुम्हाला आयकर विभागाच्या ई-फिलिंग पोर्टलवर जावे लागेल.

  1. प्रथम तुम्ही प्राप्तिकर विभागाच्या अधिकृत वेबसाइट www.incometax.gov.in/iec/foportal वर जा.

2. नंतर तुम्ही Verify your PAN वर क्लिक करा.

3. यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल.

4. येथे तुम्हाला पॅनचा संपूर्ण तपशील विचारला जाईल, जो तुम्ही भरला पाहिजे.

5. येथे तुम्ही पॅनकार्ड क्रमांक, नाव, DOB (जन्मतारीख) आणि मोबाईल क्रमांक टाका.

6. यानंतर तुमचा डेटा मेल अकाऊंट आहे की नाही असा मेसेज येईल.

7. यानंतर तुमचे पॅनकार्ड खरे आहे की बनावट हे सहज कळेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news