

कोची; पुढारी ऑनलाईन : केरळमध्ये मंगळवारी एक मोठी दुर्घटना घडली, एर्नाकुलम जिल्ह्यातील फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला, तर ३ जण गंभीर जखमी झाले. त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यास आले. हा स्फोट एवढा भीषण होता की संपूर्ण कारखाना उद्ध्वस्त झाला. सध्या पोलिसांचे पथक अपघाताचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. (Kerala Fire Broke)
मिळालेल्या माहितीनुसार, एर्नाकुलममधील वरपुझाजवळील मुत्तीनाकाठ येथे फटाक्यांची फॅक्टरी आहे. सायंकाळी साडेपाच वाजता स्फोट झाला. ज्यामध्ये अनेक लोक जखमी झाले. पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले आणि सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी एकाला मृत घोषित केले, तर तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोट इतका जोरदार होता की त्याचा आवाज ५ किलोमीटरपर्यंत ऐकू आला. (Kerala Fire Broke)
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर आग लागली होती. अशा स्थितीत संपूर्ण परिसर तातडीने रिकामा करण्यात आला. सध्या आग आटोक्यात आणण्यात आली आहे. त्याचबरोबर जखमींवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत अपघाताचे कारण समजू शकलेले नाही. गुन्हा दाखल करून पोलीस पथक तपास करत आहे. (Kerala Fire Broke)
ओडिशातही दोघांचा मृत्यू
दुसरीकडे, ओडिशातील जगतसिंगपूर जिल्ह्यातील इच्छापूर येथे फटाक्यांच्या कारखान्याला आग लागल्याचे वृत्त आहे. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. याप्रकरणी एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, कारखान्यात आग लागल्याचे वृत्त कळताच अग्निशमन दलाचे पथक पोहोचले होते, अशा परिस्थितीत आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवण्यात आले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस गुन्हा दाखल करून तपास करत आहेत.
अधिक वाचा :