Vickykat wedding : कॅटच्या लग्नातील अंगठीवर सगळ्याच्या नजरा
मुंबई; पुढारी ऑनलाईन
बॉलिवूड अभिनेता विक्की कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कॅटरिना कैफ (Katrina Kaif) हे राजस्थानमध्ये लग्नबंधनात ( Vickykat wedding ) अडकले. या विवाहसोहळ्यातील सुंदर फोटो कॅट आणि विक्कीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यानंतर दोघांना बॉलिवूड कलाकारांसोबत अनेक चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या विवाहातील खास म्हणजे, कॅटने साखरपुड्याच घाललेली हिऱ्याच्या अंगठीने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
विक्की कौशल आणि कॅटरिना कैफने दोघांनी सोशल मीडियावर लग्नाचे ( Vickykat wedding ) फोटो शेअर केले आहे. लग्नात कॅटने लाल रंगाचा ब्रायडल लेहेंगा तर विक्कीने क्रिम रंगाची शेरवानी परिधान केली होती. प्रसिद्ध डिझायनर सब्यसाची यांनी डिझायन केलेल्या या वेशभूषेत दोघेही खूपच सुंदर दिसत होते.
दोघांनी शेअर केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये 'आमच्या हृदयात फक्त प्रेम आणि कृतज्ञता आहे. यामुळे आम्ही या विवाहापर्यंत पोहोचलो आहोत. तुम्हा सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद, आम्ही एकत्रित या नवीन प्रवासाची सुरुवात करणार आहोत.' असे लिहिले आहे.
हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटीसोबत चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. यात प्रियांका चोप्रा, आलिया भट्ट, दीपिका पादूकोण, मनीष मल्होत्रा, ऋतिक रोशन, जाह्नवी कपूर, श्वेता बच्चन, टाइगर श्रॉफ आणि परिणीती चोप्रा या कलाकारांनी दोघांना सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या. या लग्नातील आकर्षणाचा केंद्रबिदू कॅटच्या साखरपुढ्यातील हिऱ्याच्या अंगठी ठरली.
अंगठीची किमंत ७ लाख
विक्कीने साखरपुढ्यात कॅटच्या हातात निळ्या रंगाची हिऱ्याची अंगठी घातली. ही अंगठी हिरे आणि प्लॅटिनमपासून बनवलेली असून यांची सुमारे ७. ४ लाख रुपये किमंत आहे. या चकचकीत दिसणाऱ्या अंगठीने चाहत्यांचे लक्ष वेधून गेतले आहे.
राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यात विक्की आणि कॅटरिना कैफचा लग्नसोहळा पार पडला. या लग्न सोहळ्यात जवळचे कुटुंबिय उपस्थित होते. कॅटरिना आणि विक्की जवळपास गेली दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. या लग्नाला निर्माता कबीर खान, त्याची पत्नी मिनी माथुर, नेहा धूपिया, अंगद बेदी, 'धूम 3' चे दिग्दर्शक विजय कृष्ण आचारा यांचा समावेश झाले होते.
हेही वाचलंत का?

