कल्याण डोंबिवलीत ५ वर्षांतील सर्वाधिक तापमानाची नोंद

कल्याण डोंबिवलीत ५ वर्षांतील सर्वाधिक तापमानाची नोंद
Published on
Updated on

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : डोंबिवली येथे गेल्या 3 दिवसांपासून उन्हाचा पारा वाढला आहे. उन्हामूळे होरपळून निघालेल्या कल्याण डोंबिवलीत तापमानाने आज नवा उच्चांक केला. आज तब्बल 43 अंश सेल्सियस तर डोंबिवलीत 42.8 अंश सेल्सियस इतक्या विक्रमी तापमानाची नोंद झाली. पाच वर्षांपूर्वी म्हणजेच 2017 नंतरचे हे कल्याण डोंबिवलीतील सर्वाधिक तापमान ठरले आहे. कल्याण डोंबिवलीत अक्षरशः विदर्भातील उन्हाळ्याप्रमाणे चटके बसत आहेत.

तसेच, कल्याण डोंबिवलीमध्येही तापमानाचा पारा चढताच दिसत आहे. भयानक उकाड्याचा आजचा लागोपाठ 4 था दिवस असून मार्च महिन्यातील सर्वाधिक तापमान आज नोंदवण्यात आले. याआधी 27 मार्च 2017 मध्ये कल्याणात 43 अंश सेल्सियसची नोंद झाली होती. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच 2019 मध्येही 41 ते 42 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती. अशी माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली.

तसेच कल्याणप्रमाणे डोंबिवलीतही यंदाच्या मोसमातील सर्वाधिक म्हणजेच 42.8 अंश सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. ही तापमान वाढ म्हणजे उष्णतेच्या लाटेचाचा परिणाम असून विदर्भात ज्याप्रमाणे कडक ऊन असूनही घाम येत नाही अगदी तशीच परिस्थिती आपल्याकडेही निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. कल्याण डोंबिवलीच्या तुलनेत कमी शहरीकरण झालेल्या बदलापूरमध्येही आज गेल्या 10 वर्षांतील उच्चांकी असे 42.9 अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेल्याचेही त्‍यांनी सांगितले.

ज्याप्रमाणे गेले 4 दिवस दररोज 1 ते दिड अंश सेल्सियस या प्रमाणात हे तापमान वाढत गेले. अगदी त्याचप्रमाणे उद्यापासून हळूहळू हे तापमान कमी होऊ लागेल अशी महत्वाची माहीती मोडक यांनी दिली आहे.

आज नोंदवण्यात आलेले तापमान

  • कल्याण – 43
  • डोंबिवली – 42.8
  • बदलापूर – 42.9
  • उल्हासनगर – 42.8
  • ठाणे – 42.5
  • भिवंडी – 43
  • नवी मुंबई – 42.3
  • कर्जत – 44.5

हे ही वाचलं का  

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news