

अभिनेत्री सारा अली खान चित्रपटांच्या शूटिंगनंतर भारतातील विविध ठिकाणी पर्यटनाला जात असते. त्याची माहितीही ती सोशल मीडियातून शेअर करत असते. आताही सारा काश्मीरमध्ये व्हेकेशनवर असून मित्रमैत्रिणींसोबत एन्जॉय करत आहे. सोमवारी तिने सोशल मीडियात एक व्हिडिओ शेअर केला आहे.
त्यात ती स्विमिंग पूलमध्ये मौजमस्ती करताना दिसते. विशेष म्हणजे तापमान उणे दोन अंश सेल्सियस इतके आहे. साराने व्हिडिओसोबत लिहिले आहे की, हॅप्पी मंडे. मायनस 2 अंश सेल्सियस तापमान. साराच्या या व्हिडिओला नेटकर्यांची मोठी पसंती मिळाली आहे. नुकतेच साराने एका मुलाखतीत जान्हवी कपूरसोबतच्या मैत्रीवर बोलताना म्हटले होते की, आम्ही फक्त चांगल्या मैत्रिणी नाही तर करियरबाबत गंभीर, महत्वाकांक्षी आणि ठाम मुली आहोत. दरम्यान, सारा आगामी काळात *इम्मॉर्टल अश्वत्थामा* तसेच लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित नाव न ठरलेल्या चित्रपटात दिसणार आहे.