

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासाठी राजी करू शकतात, असा विश्वास अमेरिकन व्हाईट हाऊसचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी व्यक्त केला आहे.
गेल्या वर्षभरापासून रशिया-युक्रेन युद्ध सुरू आहे. शत्रुत्व संपवण्याच्या कोणत्याही प्रयत्नांचे अमेरिका मनापासून स्वागत करेल. हे युद्ध संपवण्यासाठी मोदी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. इतकेच नाही, तर मोदी पुतीन यांच्याशी बोलून त्यांना युद्ध संपवण्यासाठी राजी करू शकतात, असे किर्बी यांनी म्हटले आहे. (PM Narendra Modi)
किर्बी यांना विचारण्यात आले की, युक्रेन आणि रशियातील युद्ध थांबवण्यास किंवा पुतीन यांना युद्धबंदी करण्याचे पटवून देण्यात पंतप्रधान मोदींना उशीर का झाला? यावर किर्बी म्हणाले की, युक्रेनियन नागरिकांसोबत जे काही घडत आहे, त्याला पूर्णपणे पुतीनच जबाबदार आहेत. ते ऊर्जा आणि त्यासंबंधित पायाभूत सुविधांवर क्षेपणास्त्रे डागत आहेत. पुतीन यांना युक्रेनमधील ऊर्जा संसाधने नष्ट करायची आहेत. युक्रेनमधील लोकांना आणखी अडचणीत आणण्यासाठी पुतीन सर्व काही करत आहेत. (PM Narendra Modi)
अमेरिका, फ्रान्सकडून कौतुक
युद्ध सुरू झाल्यापासून मोदी यांनी पुतीन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी अनेकवेळा बोलले होते. उझबेकिस्तानमधील समरकंद येथे झालेल्या शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या शिखर परिषदेत मोदी म्हणाले होते की, मला माहीत आहे की, सध्याचे युग युद्धाचे नाही. यावर मी पुतीन यांच्याशी फोनवर अनेकवेळा चर्चा केली आहे. आज आपण शांतता कशी प्रस्थापित करू शकतो यावर बोलायचे आहे. अमेरिकेने मोदी यांच्या या वक्तव्याचे स्वागत केले होते. तसेच मोदींनी समरकंदमध्ये बरोबरच सांगितले होते की ही युद्धाची वेळ नाही, असे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही म्हटले आहे.
अधिक वाचा :