

पुढारी ऑनलाईन डेस्क: काल (दि.१८) मध्यरात्री गाझा शहरातील अल अहली अरब हॉस्पिटलवर रॉकेट हल्ला झाला. यामध्ये सुमारे ५०० हून अधिक पॅलेस्टिनी नागरिक मारले गेले. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आज इस्रायल दौऱ्यावर आहेत. दरम्यान राष्ट्राध्यक्ष बायडेन आणि इस्रायल पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची भेट झाली. यानंतर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी नेतन्याहू यांच्यात झालेल्या बैठकीत हमास इस्रायल संघर्षावर महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या चर्चेदरम्यान गाझामधील हॉस्पिटलवरील हल्ला 'इतर संघटने'ने केल्याचे बायडेन यांनी म्हटले आहे. (Joe Biden In Israel)
अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यात आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी हमास-इस्रायल संघर्षावर चर्चा झाली. दरम्यान जो बायडेन यांनी "मी जे पाहिले त्यावरून असे दिसते की, पॅलेस्टाईनमधील गाझा शहरातील अल अहली अरब हॉस्पिटलवर झालेला हल्ला हा इस्रायलने नाही तर, तो 'इतर संघटनेटने केला आहे. हॉस्पिटल परिसरात अनेक लोक होते, पण हा स्फोट कशामुळे झाला याची त्यांना खात्री नव्हती". असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी नेतन्याहू यांनी वॉशिंग्टन इस्रायलला स्वतःचा बचाव करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींचा पुरवठा करेल. असे आश्वासन या बैठकीदरम्यान दिले. (Joe Biden In Israel)
गाझा शहरातील हॉस्पिटलवर मंगळवारी (दि.१७) रात्री उशिरा झालेल्या भीषण हल्ला हा इस्रायलने केल्याचे हमासने म्हटले होते. तर हमास दहशतवादी संघटनेचा हा दावा इस्रायलने फेटाळला होता. त्यानंतर स्त्रायलच्या संरक्षण मंत्रालयाकडून ऑडिओ रेकॉर्डिंग जारी करत, दहशतवाद्यांकडून रॉकेट मिस फायर झाल्याने ही दुर्घटना घडल्याचे म्हटले होते. यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यात झालेल्या बैठकीत हे इतर कोणत्यातरी संघटनेचे कृत्य असल्याचे बायडेन यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (Joe Biden In Israel)
शनिवारी (दि.१८) अचानक हमास दहशतवादी संघटनेने इस्रायलवर शक्तिशाली हल्ला केला. या हल्ल्यात अनेक निष्पाप इस्रायली नागरिकांची वाईट पद्धतीने हत्या करण्यात आली. यावरून हमास इस्लामिक स्टेटपेक्षा वाईट आहे,असे जो बायडेन यांनी पुन्हा स्पष्ट केले. हमासच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या 1,300 हून अधिक इस्रायलींमध्ये 31 अमेरिकन लोक होते, असेही जो बायडेन म्हणाले. आम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे की, "हमास सर्व पॅलेस्टिनी लोकांचे प्रतिनिधित्व करत नाही आणि त्यांना फक्त त्रास दिला जात आहे" असेही बायडेन यांनी सांगितले.