जीव माझा गुंतला : अंतरा
जीव माझा गुंतला : अंतरा

जीव माझा गुंतला मालिकेत अंतराचा “हटके” अंदाज!

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला मालिकेत येणार्‍या वेगवेगळ्या घटनांमुळे मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. अंतरा आणि मल्हारची केमेस्ट्री, त्यांच्यातील नोक झोक कधी त्यांच्यातील अबोला, तर कधी त्यांच्यातील भांडण लोकांना आवडत आहे. खानविलकरांच्या घरी येणार्‍या विशेष पाहुण्यांसाठी मल्हारने अंतराला टास्कच दिला आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि ते नाही जमलं तर आईच्या घरी असे देखील तो म्हणाला. त्यामुळे आता अंतरा आता पदर खोचून तयारीला लागली आहे.

अंतराचे इंग्लिश ऐकून मल्हार थक्क झाला तर दुसरीकडे याआधी कधीही हिल्स न घातल्याने आता ती हिल्स घालून चालण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे. मल्हारची साथ मिळतेच आहे पण यामध्ये चित्रा आणि श्वेता काहीतरी कट रचणार हे निश्चित. अंतराचा हटके अंदाज मालिकेत्न बघायला मिळणार आहे. अंतरा वेस्टर्न लुकमध्ये सगळ्यांच्या समोर आल्यावर खासकरून मल्हार सरांची काय रिएक्शन असेल हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news