

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशातील पूर्वकडील एक राज्य अशी झारखंडची ओळख आहे. एकेकाळी दक्षिण बिहारचा भाग असणार्या हा प्रदेश १५ नोव्हेंबर २००० रोजी स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्वात आला. त्यावेळी केंद्रात अटल बिहार वाजपेयी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार होते. याचवर्षी उत्तर प्रदेशमधून उत्तराखंड तर मध्य प्रदेशमधून छत्तीसगड राज्यांची निर्मिती झाली होती. एकाच वर्षी जन्म झालेल्या या तीन राज्यांचा आज विचार करता अन्य दोन राज्यांची प्रगती हा चर्चेचा विषय ठरतो. तर विकासापासून वंचित अशीच झारखंडची ओळख सांगितली जाते. बुधवार, ३१ जानेवारी रोजी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सक्तवसुली संचालनालयाने जमीन घोटाळा प्रकरणी अटक केली. त्यामुळे पुन्हा एकदा हे राज्य चर्चेत आले आहे. आता त्यांचे बंधू चंपाई सोरेन हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. गेल्या २३ वर्षात राज्यात तब्बल १२ मुख्यमंत्री झाले आहेत. ( Jharkhand 12 chief ministers in 23 years, Champai Soren likely to be the new chief minister) जाणून घेवूया या राज्यातील मुख्यमंत्री बदलाचा इतिहास…
शिबू सोरेन यांनी १९६० मध्ये सोनट संथाली समाजाचा पाया घातला. ४ फेब्रुवारी १९७३ मध्ये त्यांनी झारखंड मुक्ती मोर्चाची स्थापना केली होती. संथाली समाजाने त्यांना 'दिशोम गुरू' म्हणजेच 'दहा दिशांचे गुरू' असे नाव दिले. तेव्हापासून शिबू सोरेन यांना 'गुरुजी' म्हणून ओळखले जाऊ लागले. मात्र झारखंडचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा बहुमान भारतीय जनता पक्षाचे नेते बाबुलाल मरांडी यांना मिळाला. २००५ विधानसभा निवडणूक झाली. 2 मार्च 2005 रोजी शिबू सोरेन पहिल्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री बनले परंतु 10 दिवसांनंतर त्यांची सत्ता गेली. बहुमत सिद्ध करण्यास अपयश आल्याने त्यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावे लागले हाेते. सर्वात अल्पकाळ राहिलेले मुख्यमंत्री असा नामुष्कीजनक विक्रमही त्याच्या नावावर नाेंदवला गेला. 27 ऑगस्ट 2008 रोजी शिबू सोरेन पुन्हा झारखंडचे मुख्यमंत्री बनले; परंतु 19 जानेवारी 2009 रोजी त्यांचे सरकार पुन्हा काेसळले. अशा प्रकारे शिबू साेरेन केवळ 4 महिने 23 दिवस मुख्यमंत्रीपदी राहिले. यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली हाेती. ( Jharkhand 12 chief ministers in 23 years, Champai Soren likely to be the new chief minister )
झारखंडच्या स्थापनेपासूनचा इतिहास पाहता २००० ते २०१४ या १४ वर्षांच्या कार्यकाळात बाबुलाल मरांडी, शिबू सोरेन, अर्जुन मुंडा, हेमंत सोरेन, मधु कोडा आणि हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील नऊ सरकारे आली. भाजपचे बाबुलाल मरांडी हे झारखंडचे पहिले मुख्यमंत्री बनले. जे सुमारे दोन वर्षे आणि तीन महिने सत्तेत राहिले. या १४वर्षांच्या कार्यकाळात झारखंड मुक्ती मोर्चाचे शिबू सोरेन आणि भाजपचे अर्जुन मुंडा यांनी प्रत्येकी तीनवेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर हेमंत सोरेन, मधु कोडा आणि बाबूलाल मरांडी यांनी एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान, अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे राज्यात तीन वेळा राष्ट्रपती राजवटही लागू झाली हाेती.
( Jharkhand 12 chief ministers in 23 years, Champai Soren likely to be the new chief minister )
२०१४पर्यंत झारखंडमधील जनतेने पाच मुख्यमंत्री आणि ९ वेळा सरकार स्थापन झाल्याचे पाहिले. २०१४ च्या निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळाले. त्यामुळे राज्यात स्थिर सरकार आले. भाजपचे रघुबर दास हे मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षांच्या कार्यकाळ पूर्ण करणारे ते झारखंडचे पहिले आणि एकमेव (आतापर्यंत) मुख्यमंत्री ठरले.
शिबू सोरेन यांचे राजकीय वारसदार असणारे हेमंत सोरेन राज्याच्या स्थापनेपासून राजकारणात सक्रीय आहेत. त्यांचे वडील शिबू सोरेन यांच्याप्रमाणेच अटक झालेले ते राज्यातील तिसरे मुख्यमंत्री आहेत. सोरेन पिता-पुत्रांबरोबर झारखंडच्या मुख्यमंत्रीपदी असताना मधु कोडा यांनाही अटक झाली हाेती.
२०१९ विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. यानंतर भाजपचे नेते अर्जुन मुंडा केंद्रात मंत्री झाले. २०१९ झालेल्या निवडणुकीत हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस आघाडी सरकारचा विजय झाला. मात्र आता जमीन घोटाळा प्रकरणी अटक झाल्याने हेमंत साेरेन यांच्यवर पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद सोडण्याची नामुष्की ओढवली आहे. त्यांचे बंधु चंपाई सोरेन हे मुख्यमंत्री आहेत. ते राज्याचे १२वे मुख्यमंत्री ठरणार आहेत. त्यामुळे राज्यात झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, अशी शक्यता आहे. मात्र सलग पाच वर्ष मुख्यमंत्रीपदी आपला कार्यकाळ पूर्ण करणयास हेमंत सोरेन अपयशी ठरले आहेत.
( Jharkhand 12 chief ministers in 23 years, Champai Soren likely to be the new chief minister)
हेही वाचा :