Jat Crime : सांगली – कुणिकोणुरात मेंढपाळावर हल्ला, तिघे गंभीर

Jat Crime : सांगली – कुणिकोणुरात मेंढपाळावर हल्ला, तिघे गंभीर
Published on
Updated on

Jat Crime – कुणिकोणुर (ता. जत) येथे रस्त्याच्या बाजूने मेंढपाळ मेंढ्या राखत होता. त्यावेळी तुम्ही आमच्या शेतात मेंढ्या का घातल्या यावरून वाद झाला. यावेळी कर्नाटकातील तिघा मेंढपाळांना दगडाने व काठीने गंभीर जखमी केल्याचा प्रकार घडला. गंभीर जखमी केल्याप्रकरणी प्रकाश उर्फ गोटू बळीराम चव्‍हाण (वय २८) कोणीकोनूर याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी संशयित आरोपी चव्हाण यास मिरज येथून अटक केली आहे . ही घटना गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे. (Jat Crime)

चव्हाण यांनी केलेल्या गंभीर हल्ल्यात राघू पांडू गोरड (वय ४५) व याराप्पा बाजू सुळ (रा. अलिबादी, ता. विजापूर, जि. विजयपूर कर्नाटक) व अन्य एक जण गंभीर जखमी झाले आहेत.

दरम्यान या घटनेनंतर शुक्रवारी सकाळी या कळपा सोबत असलेल्या मनीषा तानाजी कोळेकर (वय .२२) या गर्भवती महिलेचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला आहे. यामुळे या मेंढपाळ बांधावावर संकटाची मालिका सुरू झाली आहे. पोटासाठी भटकंती करणाऱ्या मेंढपाळ बांधवावर दिपावाळीतच असा प्रसंग आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

सामाजिक संघटनेने संबंधित आरोपी गुन्हेगार प्रवृत्तीचा असून त्यांच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत.तरी त्याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्याकडे केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी- कुणिकोणुर – सनमडी या रस्त्याच्या बाजूने कर्नाटक येथून आलेले मेंढपाळ मेंढ्या चारत होते. यावेळी काही मेंढ्या चव्हाण यांच्या शेतात गेल्या.

यावेळी संशयित आरोपी प्रकाश उर्फ गोट्या चव्हाण याने जायाप्पा गोरड व यराप्पा सुळ यांना शिवीगाळ केली. मेंढ्या आमच्या शेतात घातल्या म्हणत दगडाने व काठीने गंभीर दोघांना जखमी केले. यात कळपात सोबत असणाऱ्या अन्य एक जण मेंढपाळ जखमी झाला आहे.

यावेळी या मेंढपाळांची नातेवाईक मनीषा कोळेकर भांडणे सोडवण्यासाठी या ठिकाणी गेल्या होत्या. परंतु चव्हाण यांनी ढकलून दिले होते. दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी सकाळी माडग्याळ येथील एका शेततलावात मनीषा कोळेकर या गर्भवती महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, मेंढपाळांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालय माडग्याळ येथे उपचारासाठी दाखल केले होते. यावेळी संशयित आरोपी चव्हाण या ठिकाणी आला होता. मेंढपाळांना का जखमी केले, अशी विचारणा सामाजिक कार्यकर्ते कामांना बंडगर यांनी केली.

चव्हाण यांनी बंडगर यांच्या अंगावर दगडे टाकण्याचा प्रयत्न केला. तसेच बघून घेण्याची धमकी दिली. यामुळे काही काळ वातावरण तणावाचे बनले होते. जखमी गोरड व सुळ उपचारासाठी शासकीय रुग्णालय मिरज येथे उपचार करीत आहेत. या घटनेचा तपास पोलीस नाईक खरात करत आहेत.

मेंढपाळावर हल्ले करणाऱ्या कडक कारवाई करावी : सौ. तेजस्विनी व्हनमाने

धनगर समाजातील मेंढपाळ बांधव व महिलांवरील अन्याय व अत्याचार वारंवार घडत आहेत. परंतु संबंधित पोलिस ठाण्यात कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. कुणिकोणुर येथे झालेल्या घटनेमुळे भयभीत झालेल्या मनीषा कोळेकर या गर्भवती महिलेचा शेततलावातील पाण्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मेंढपाळांवर हल्ला करणाऱ्या आरोपी चव्हाण याच्यावर कडक कारवाई करावी. अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा मल्हार क्रांती संघटनेच्या जिल्हाध्यक्षा तेजस्विनी व्हनमाने यांनी दिला आहे.

हेही वाचलं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news