

राशिवडे, पुढारी वृतसेवा : पुणे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलमध्ये सुरु असणाऱ्या महाराष्ट्र स्टेट ऑलिंम्पिक जलतरण स्पर्धेमध्ये राशिवडे (ता. राधानगरी) येथील जलकन्या भक्ती राहुल वाडकर हिने दोन सुवर्ण, चार रौप्य व एक कास्य पदकांची लयलूट केली. दि. ९ जानेवारी ते १२ जानेवारी दरम्यान या स्पर्धा पार पडल्या.
जलपरी भक्ती वाडकरने फ्री स्टाईल मिडले रीले व मिडले रीलेमध्ये दोन सुवर्ण, बॅक स्ट्रोक व मिडले रीले प्रकारात चार रौप्य व दोनशे मिटर मिडले रीले प्रकारात एक कांस्यपदकांची कमाई केली. ती सध्या बालेवाडी येथील क्रीडा संकुलात प्रशिक्षक बालाजी केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.
.हेही वाचा