चंद्रपूर : बल्लारशाहा रेल्वे स्थानकावरील लोखंडी पूल कोसळला; २० प्रवासी जखमी

चंद्रपूर : बल्लारशाहा रेल्वे स्थानकावरील लोखंडी पूल कोसळला; २० प्रवासी जखमी
Published on
Updated on
चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : बल्लारशाहा रेल्वेस्थानकावर प्रवाशी सूरू असलेला पादचारी लोखंडी पूल आज (दि. २७) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास कोसळला. या अपघातात वीस प्रवासी जखमी झाले असून यातील चार जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना रेल्वे लोहमार्ग पोलिस आणि आरपीएफच्या दलाने रुग्णालयात दाखल केले आहे. घटनास्थळी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी दाखल झाले असून, अपघाताची माहिती घेत आहे.
बल्लारपूर हे रेल्वे जंक्शन आहे. महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरील हे रेल्वेस्थानक आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास रेल्वे स्थानकावरील पादचारी पूल कोसळला. या घटनेच्या वेळी रेल्वे स्थानकावर काजीपेठ – पुणे पॅसेंजर ही रेल्वे आली होती. त्यामुळे प्रवाशांची यापूलावरून वर्दळ होती. यामुळे जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. घटनास्थळी रेल्वे पोलीस आणि वरिष्ठ अधिकारी पोहचले असून, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक एकवरून तीन आणि चार फलाटकडे प्रवाशांना येण्याजाण्यासाठी या एकमेव पादचारी लोखंडी पुलाचा वापर केला जातो. घटनेच्या वेळी फलाट क्रमांक चारवर काजीपेट पॅसेंजर आली होती. त्यावेळीही पुलावर प्रवाशांची मोठी वर्दळ होती. नेमक्या याच वेळी लोखंडी पुलाचा मध्यभाग खाली कोसळल्याने हा अपघात घडला. या अपघातात नीलेश पाटील, प्रेम तितरे, चैतन्य मनोज भगत, निधी मनोज भगत, छाया मनोज भगत, नयन बाबाराव भीवनवार, राधेश्याम सिंग, अनुराग खरतड, रिया खरतड, स्विटी खरतड, विक्की जयंत भीमलवार, पूजा सोनटक्के, ओम सोनटक्के जखमी झाले.
अपघाताची घटना कळताच राज्‍याचे वने, सांस्‍कृतिक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री व चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी त्वरित दखल घेत सर्व जखमींना आवश्‍यक त्‍या सर्व सुविधा पुरविण्‍याचे निर्देश जिल्‍हा सामान्य रुग्णालय प्रशासनाला दिले. तसेच या घटनेची संपूर्ण चौकशी करण्‍याचे निर्देश ना. मुनगंटीवार यांनी चंद्रपूरचे जिल्‍हाधिकारी विनयकुमार गौड़ा तथा पोलिस अधिक्षक परदेशी यांना दिले आहेत. या प्रकरणी शासन स्तरावरुन मदत मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत.
हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news