IPL Playoff 2023 : लखनौच्या विजयामुळे ‘प्लेऑफ’ची सारी समीकरणे बदलली; आता ‘या’ तीन संघांना संधी

IPL Playoff 2023 : लखनौच्या विजयामुळे ‘प्लेऑफ’ची सारी समीकरणे बदलली; आता ‘या’ तीन संघांना संधी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : निकोलस पूरनची अर्धशतकी खेळी आणि रवी बिश्नोईच्या फिरकीच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सने कोलकाता नाईट रायडर्सचा १ रन ने पराभव केला. हा सामना ईडन गार्डनवर खेळवण्यात आला होता. दरम्यान केकेआरला पराभूत करुन लखनौने प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. (IPL Playoff 2023)

दरम्यान,  लखनौच्या विजयामुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर किंवा मुंबई इंडियन्स प्लेऑफमधून बाहेर पडणार आहे. प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा लखनौ तिसरा संघ ठरला आहे. यापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्सने प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. केकेआरचा पराभव केल्यानंतर लखनौचे एकूण गुण १७ झाले आहेत. (IPL Playoff 2023)

लखनौच्या विजयामुळे 'प्लेऑफ'ची सारी समीकरणे बदलली; आता 'या' तीन संघांना संधी

केकआरला पराभुत करुन लखनौने प्लेऑफचे तिकिट मिळवले. या विजयमुळे मुंबई आणि आरसीबीची वाट अतिशय खडतर झाली आहे. लखनौचे पॉईंट्स टेबलमध्ये ३ नंबरचे स्थान पक्के झाले आहे. आता मुंबई आणि आरसीबी चौथ्या जागेसाठी भिडणार आहेत. शिवाय राजस्थानही प्लेऑफच्या शर्यतीमध्ये कायम आहे.   रविवारी मुंबई इंडियन्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. तर आरसीबीची भिडत गुजरात टायटन्सशी असणार आहे. मुंबई आणि आरसीबी या दोन्ही संघांना प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विजयासह धावगती वाढवण्याची आवश्यकता असणार आहे. मुंबई किंवा आरसीबी यापैकी एका संघालाही पराभव पत्करावा लागला तर प्लेऑफचा पत्ता कट होणार आहे. शिवाय दोन्ही संघांनी विजय जरी मिळवला. तरी ज्या संघाची धावगती (रनरेट) जास्त असेल तो संघ प्लेऑफमध्ये जागा पक्की करणार आहे. (IPL Playoff 2023)

राजस्थानलाही प्लेऑफमध्ये मिळू शकतो प्रवेश (IPL Playoff 2023)

दरम्यान, रविवारी आयपीएलमध्ये २ सामने रंगणार आहेत. आता मुंबई आणि आरसीबी चौथ्या जागेसाठी भिडणार आहेत.  रविवारी मुंबई इंडियन्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. तर आरसीबीची भिडत गुजरात टायटन्सशी असणार आहे. जर मुंबई आणि आरसीबी या दोन्ही संघांना पराभवाला सामोरे जावे लागले आणि राजस्थान रॉयल्सची धावगती दोन्ही संघांपेक्षा चांगली असेल तर राजस्थान रॉयल्सला प्लेऑफमध्ये प्रवेश मिळू शकतो. (IPL Playoff 2023)

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news