LSG vs KKR
LSG vs KKR

LSG vs KKR : लखनौची प्लेऑफमध्ये धडक, रोमहर्षक सामन्यात मारली बाजी

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : निकोलस पूरनची अर्धशतकी खेळी आणि रवी बिश्नोईच्या फिरकीच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सने कोलकाता नाईट रायडर्सवर केवळ १ रनने विजय मिळवला. हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डनवर खेळवण्यात आला होता. सुरुवातीला केकेआरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि लखनौला फलंदाजीचे आमंत्रण दिले. यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या लखनौने १७६ धावा केल्या आणि केकआरसमोर १७७ धावांचे आव्हान ठेवले.

लखनौच्या १७७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरला १७५ धावाच करता आल्या. केकेआरकडून रिंकू सिंग ३३ चेंडूमध्ये ६७ जेसन रॉय २८ चेंडूमध्ये ४५, व्यंकटेश अय्यर १५ चेंडूमध्ये २४, गुजराज १५ चेंडूमध्ये १० धावांचे योगदान दिले. लखनौकडून रवी बिश्नोई आणि यश ठाकूरने प्रत्येकी २ तर कुणाल पंड्या आणि कृष्णाप्पा गौतमने प्रत्येकी १ विकेट पटकावली.

तत्पूर्वी, लखनौकडून क्विंटन डिकॉक २७ चेंडूमध्ये २८, प्रेरक मांकडने २० चेंडूमध्ये २६, आयुष बदोनी २१ चेंडूमध्ये २५ आणि निकोलस पूरन ३० चेंडूमध्ये ५८ धावांचे योगदान दिले. निकोलस पूरनच्या आक्रमक अर्धशतकी खेळीमुळे लखनौला १७६ धावा करता आल्या आहेत. केकआरकडून वैभव अरोरा, शार्दुल ठाकुर, सुनिल नरेन यांनी प्रत्येकी २ विकेट्स पटकावल्या तर हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी १ विकेट पटकावली.

लखनौच्या विजयामुळे 'प्लेऑफ'ची सारी समीकरणे बदलली; आता 'या' तीन संघांना संधी

केकआरला पराभुत करुन लखनौने प्लेऑफचे तिकिट मिळवले. या विजयमुळे मुंबई आणि आरसीबीची वाट अतिशय खडतर झाली आहे. लखनौचे पॉईंट्स टेबलमध्ये ३ नंबरचे स्थान पक्के झाले आहे. आता मुंबई आणि आरसीबी चौथ्या जागेसाठी भिडणार आहेत. रविवारी मुंबई इंडियन्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. तर आरसीबीची भिडत गुजरात टायटन्सशी असणार आहे. मुंबई आणि आरसीबी या दोन्ही संघांना प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विजयासह धावगती वाढवण्याची आवश्यकता असणार आहे. मुंबई किंवा आरसीबी यापैकी एका संघालाही पराभव पत्करावा लागला तर प्लेऑफचा पत्ता कट होणार आहे. शिवाय दोन्ही संघांनी विजय जरी मिळवला. तरी ज्या संघाची धावगती (रनरेट) जास्त असेल तो संघ प्लेऑफमध्ये जागा पक्की करणार आहे. शिवाय दोन्ही संघांचा पराभव झाला आणि राजस्थान रॉयल्सची धावगती या दोन्ही संघांपेक्षा चांगली राहिल्यास राजस्थानला प्लेऑफचे तिकीट मिळू शकते.

हेही वाचंलत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news