अहमदनगर : बिबट्यांचे अवयवांची बेकादेशीर विक्री करणाऱ्या तिघांना वनविभागाने रंगेहात पकडले | पुढारी

अहमदनगर : बिबट्यांचे अवयवांची बेकादेशीर विक्री करणाऱ्या तिघांना वनविभागाने रंगेहात पकडले

संगमनेर, पुढारी वृत्तसेवा : बिबट्यांचे अवयव बेकादेशीर विक्री करताना वनखात्याच्या पथकाने २ दोघांना रंगेहाथ पकडले आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. श्रीराम यादव सरोदे (वय ३४), सुधीर विजय भालेराव (वय ३०) सुशांत उत्तम भालेराव (रा.आनंदवाडीता. संगमनेर) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

संगमनेर तालुक्यात बिबट्यांच्या अवयवाची विक्री होत असल्याची माहिती वनखात्याला मिळालेली होती. शुक्रवारी तालुक्यातील चंदनापुरीच्या आनंदवाडी परिसरात बिबट्यांचे दात,सुळे, मिशायांची विक्री होणार असल्याची गोपनीय माहिती वन खात्याला मिळाली. बिबट्यांच्या अवयवाची विक्री होत असल्याची खातरजमा करण्यासाठी वनखात्याच्या पथकाने सापळा रचला रचला. या पथकातील कर्म चारी बनावट ग्राहक बनून आनंदवाडी येथे संबंधित आरोपींना भेटले. हे आरोपी या पथकाच्या जाळ्यात अलगद अडकले.

अधिक तपास उपविभागीय वनअधिकारी संदिप पाटील आणि उपवनसंरक्षक जुन्नर अमोल सातपुते व योगेश वरखड यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. वनपरिक्षेत्र संगमनेर भाग-१ चे श्री. सचिन लोंढे, वनविभाग जुन्नर व W.C.C.B यांची टिम,रईस मोमिन, संदिप येवले, कुणाल घुले, तन्मय बागल, हारुन सव्यद, विक्रांत बुरांडे, अरुण देशमुख, गजानन पवार यांनी कार्यवाही केली.

हेही वाचंलत का?

Back to top button