काबूल; पुढारी ऑनलाईन : तालिबान्यांना अफगाणमध्येच थेट धमकी : अफगाणिस्तानवर तालिबानच्या नियंत्रणादरम्यान लोक या 'दहशतवादी संघटने'विरोधात एकत्र येत आहेत. भूतकाळात तालिबानच्या विरोधात लढलेल्या अहमद शाह मसूदचा मुलगा अहमद मसूदने आता 'या संघटने'विरोधात मोर्चा उघडला आहे. अहमद मसूदने तालिबानविरुद्धच्या या युद्धात जगाकडून मदतही मागितली आहे.
वॉशिंग्टन पोस्टसोबतच्या संभाषणात अहमद मसूद म्हणाला की, 'मुजाहिदीनचे लढाऊ पुन्हा एकदा तालिबानशी लढायला तयार आहेत. आमच्याकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा आहे. अफगाणिस्तान नॅशनल रेझिस्टन्स फ्रंटच्या अहमद मसूदने तालिबानविरुद्ध संघर्ष सुरू ठेवण्याची घोषणा करून आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवण्याची इच्छाशक्ती दाखवली आहे.
तो म्हणाला की, 'मुजाहिद्दीनचे लढाऊ पुन्हा एकदा तालिबानचा मुकाबला करण्यास तयार आहेत. आमच्याकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा आहे. माझ्या आवाहनावर अनेक लोक एकत्र आले आहेत. लष्कराचे अनेक जवानही माझ्याबरोबर आहेत जे तालिबानसमोर गुडघे टेकल्याने संतापले आहेत.
तथापि, अहमद मसूदने कबूल केले की तालिबानशी लढण्यासाठी हे पुरेसे नाही, म्हणून त्याने इतर देशांनाही मदतीचे आवाहन केले. तो म्हणाला की, तालिबान हा केवळ अफगाणिस्तानच नाही तर संपूर्ण जगाचा शत्रू आहे. त्यांच्या अधिपत्याखाली, अफगाणिस्तान दहशतवाद्यांचा गड बनेल.
अहमद मसूद व्यतिरिक्त, अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनीही तालिबानविरोधातील संघर्ष सुरू ठेवण्याची घोषणा केली आहे.
सालेह यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'ज्या लाखो लोकांनी मला निवडले त्यांना मी निराश करणार नाही. मी कधीच तालिबानसोबत असणार नाही.
दुसऱ्या ट्विटमध्ये सालेह म्हणाले की, 'याविषयी अमेरिकेशी बोलण्यात आता काहीच अर्थ नाही. आम्ही अफगाणिस्तानांना हे सिद्ध करावे लागेल की अफगाणिस्तान व्हिएतनाम नाही. अमेरिका आणि नाटोच्या विपरीत, आम्ही अद्याप आपला आत्मा गमावला नाही.
दरम्यान, सालेह काबूलच्या ईशान्येस स्थित असलेल्या पंजशीर व्हॅलीमध्ये असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तालिबानचा मुकाबला करण्यासाठी सालेह आणि मसूदची मुले पंजशीरमध्ये एकत्र येत आहेत.
नैसर्गिक संपत्तीने समृद्ध असलेल्या पंजशीर व्हॅली १९९० च्या गृहयुद्धात कधीच तालिबानच्या ताब्यात आले.
एक दशक आधी (तत्कालीन) सोव्हिएत युनियनने सुद्धा ते जिंकले शकले नव्हते.
आम्ही तालिबानला पंजशीरमध्ये प्रवेश करू देणार नाही, असे एका रहिवाशाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
तो म्हणाला की, आम्ही सर्व शक्तीने त्याला विरोध करू आणि लढू.
हे ही वाचलं का?
https://youtu.be/0C9F33TFAhc