अफगाणिस्तान : भारतीय दुतावासाची सुरक्षा करणारे तीन श्वान मायदेशी परतले

अफगाणिस्तान : भारतीय दुतावासाची सुरक्षा करणारे तीन श्वान मायदेशी परतले
Published on
Updated on

अफगाणिस्तान तालिबान्यांच्या ताब्यात गेल्यानंतर अनेक देशांनी अफगाणिस्तानातील आपले दुतावास खाली करण्यास सुरुवात केली आहे. भारतानेही आपल्या काबुल येथील दुतावासातून आपले कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांना मायदेशात बोलवून घेतले. मंगळवारी आयटीबीपी च्या ९९ कमांडोंबरोबरच शोध मोहिमच्या कामात मदत करणारे माया, रुबी आणि बॉबी हे तीन श्वान भारतात परतले.

आयटीबीपी कमांडो त्यांच्यासोबत आपली वैयक्तिक शस्त्रे आणि सामनही घेऊन आले. आता ते दिल्लीतील आयटीबीपी सेंटरमध्ये आठवडाभार क्वारंटाईन असणार आहेत.

कमांडोंबरोबर नागरिक दुतावास कर्मचारीही परतले

याबाबत माहिती देताना आयटीबीपीचे प्रवक्ते विवेक कुमार पांडे म्हणाले, 'काबुल दुतावासाच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले आमचे सर्व सुरक्षा रक्षक आणि त्यांचे चार सल्लागार अफगाणिस्तान मधून भारतात परतले आहेत. हे कमांडो दुतावासातील कर्मचारी आणि भारतीय नागरिकांबरोबर परत आले आहेत.'

दरम्यान, हे कमांडो आयटीबीपीच्या बसमधून हिंदोन एअरबेसकडे रवाना झाले आहेत. तेथे त्यांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे.

तीन श्वानही मायदेशात दाखल

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अफगाणिस्तान मधून परतताना या कमांडोंनी त्यांच्यासोबत एके सिरीजचे असॉल्ट वेपन, बुलेटप्रुफ, जॅकेट, हेलमेट, संदेश उपकरणे, दारुगोळा आणि तीन श्वान देखील सोबत घेऊन आले आहेत.

अफागाणिस्तान मधून भारताचे तीस डिप्लोमॅट्स ज्यात अफगाणिस्तानातील भारताचे उच्चायुक्त रुद्रेंद्र टंडन, ९९ आयटीबीपी कमांडो आणि २१ नागरिक एअर फोर्सच्या सी-१७ ग्लोबल मास्टर विमानाने परतले. त्यांनी काबुल येथील हामिद करझई विमानतळावरुन मंगळवारी सकाळी उड्डाण केले होते. हे विमान जामनगर एअरफोर्स बेसवर काही काळ थांबले आणि त्यानंतर गाझियाबाद येथील हिंदडोन विमनतळावर संध्याकाळी लँड झाले.

अफगाणिस्तानमधून परतणाऱ्या २१ नागरिकांमध्ये ४ पत्रकारांचा समावेश आहे. आयटीबीपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आयटीबीपीने नोव्हेंबर २००२ मध्ये भारतीय दुतावाचाच्या सुरक्षेसाठी पहिल्यांदा कमांडो तैनात केले होते. जवळपास ३०० कमांडो अफगाणिस्तानमध्ये तैनात केले होते.

डेलाराम – झरांज रोड प्रोजेक्टची सुरक्षाही अयटीबीपीकडेच

त्यानंतर अशाच प्रकारे अफगाणिस्तान मधील जलालाबाद, कंदहार, मझार – ए – शरीफ आणि हेरात येथे देखील भारतीय दुतावासाची कार्यालये सुरु करण्यात आली. तेथेही आयटीबीपीने आपले सुरक्षारक्षक तैनात केले होते.

दरम्यान, तालिबानने अफगाणिस्तामधील अनेक शहरांवर आपला ताबा मिळवण्यास सुरुवात केली त्यावेळी या कार्यालयातून लोकांना बाहेर काढण्यात आले. आयटीबीपीकडे २००५ ते २००८ पर्यंत डेलाराम – झरांज रोड प्रोजेक्टच्या सुरक्षेचीही जबाबदारी होती.

अफगाणिस्तानमध्ये अनेक आयटीबीपी कमांडो दहशतवादी हल्ल्यात शहीदही झाले आहेत. अनेकांना गॅलेंटरी मेडल्सनी नावाजण्यातही आले आहे.

हेही वाचले का?

पाहा व्हिडिओ : काबूल विमानतळावर उडत्या विमानातून तिघेजण कोसळले

https://youtu.be/0C9F33TFAhc

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news