अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पडले सायकलवरून

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पडले सायकलवरून
Published on: 
Updated on: 

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे काल (शनिवारी) सायकल चालवत असताना त्यांचे संतुलन बिघडले आणि ते पडले. सुरक्षा कर्मचार्‍यांनी त्यांना उठण्यासाठी मदत केली. त्यानंतर मी बरा आहे, असे बायडेन यांनी सांगितले. दरम्यान, व्हाईट हाऊसच्या एका अधिकार्‍याने सांगितले की, सायकलवरून उतरताना बायडेन यांचे शूज पायडलमध्ये अडकले. यामुळे त्यांचे संतुलन बिघडले व ते पडले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 79 वर्षीय बायडेन सध्या डेलावेयर राज्यात सुट्टीवर आहेत. रेहोबोथ बीचवर पत्नी जिल बायडेनसोबत 'मॅरेज अ‍ॅनिव्हर्सरी' साजरी करण्यासाठी ते आले आहेत. तेथीलच स्टेट पार्कमध्ये सायकल चालवताना बायडेन पडल्याची घटना घडली.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news