Zakir Naik : फरार झाकीर नाईकचा तालिबानच्या 'शिक्षणबंदी'ला पाठिंबा; अफगाणसह पाकिस्तानमधील शिक्षणतज्ज्ञांकडून जोरदार विरोध

अफगाणिस्‍तानमधील २६ लाखांहून अधिक अफगाण मुली माध्यमिक शिक्षणापासून वंचित

Zakir Naik Taliban girls education remark :
इस्लामिक प्रचारक झाकीर नाईक.
Published on: 
Updated on: 

Zakir Naik Taliban girls education remark : इस्लामिक प्रचारक झाकीर नाईक याने अफगाणिस्तानातील मुलींच्या शिक्षणावर तालिबानने घातलेल्या बंदीचे समर्थन केले आहे. त्यांच्या या विधानावर भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये तीव्र टीका होत आहे. दरम्‍यान, युनिसेफच्या (UNICEF) ऑगस्ट महिन्यातील रिपोर्टनुसार, तालिबान पुन्हा सत्तेत आल्यापासून अफगाणिस्‍तानमधील २६ लाखांहून अधिक अफगाण मुली माध्यमिक शिक्षणापासून वंचित राहिल्या आहेत.

झाकीर नाईक काय म्हणाला?

एका व्हिडिओमध्ये झाकीर नाईकने दावा केला की, त्यांनी मुलींच्या शिक्षणाच्या मुद्द्यावर तालिबानच्या प्रतिनिधींशी स्वतः चर्चा केली होती. मुलींच्‍या शिक्षणाबाबत माध्यमांमध्ये येणाऱ्या सर्वच बातम्या खऱ्या नसतात; तालिबान मुलींना सहावीपर्यंत शाळेत जाण्याची परवानगी देते. त्यांच्या मते, सहावीच्या पुढचे शिक्षण थांबवण्यात आले आहे कारण सध्याचे वातावरण सुरक्षित नाही.


Zakir Naik Taliban girls education remark :
TCS Nashik |पीडितेच्या ब्रेनवॉशसाठी झाकिर नाईकचे व्हिडिओ

तालिबान सुरक्षेची स्थिती सुधारण्याची वाट पाहत आहे

तालिबान सुरक्षेची स्थिती सुधारण्याची वाट पाहत आहे. अफगाण महिला इस्लामिक स्टडीज, शरिया, अरबी आणि कुराण यांसारख्या विषयांत पदव्युत्तर (मास्टर्स) आणि पीएचडी पदव्या मिळवत आहेत. अफगाणिस्तानातील महिलांना उच्च शिक्षणापासून वंचित ठेवले जात आहे, असे म्हणणे चुकीचे आहे, असा दावाही झाकीर याने केला आहे.


Zakir Naik Taliban girls education remark :
पाकिस्तानी तरुणीचा प्रश्न झोंबला, झाकीर नाईक भडकला!

अफगाणिस्तानसह पाकिस्तानमधूनही विधानावर तीव्र आक्षेप

झाकीर नाईक यांनी अफगाणिस्तानातील मुलींच्या शिक्षणावर तालिबानने लादलेल्या निर्बंधांचे समर्थन केले. यांच्या या विधानांवर भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नोबेल शांतता पारितोषिक विजेती मलाला युसूफझाई हिचे वडील झियाउद्दीन युसूफझाई यांनीही त्यांच्या या तर्काला 'निराशाजनक' म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या संस्थांची आकडेवारी काय सांगते?

संयुक्त राष्ट्रांच्या संस्थांच्‍या आकडेवारीनुसार, अफगाणिस्तानातील मुलींच्या शिक्षणाची स्थिती झाकीर नाईकच्या दाव्यांच्या अगदी उलट आहे. युनिसेफच्या (UNICEF) ऑगस्ट महिन्यातील रिपोर्टनुसार, तालिबान पुन्हा सत्तेत आल्यापासून २६ लाखांहून अधिक अफगाण मुली माध्यमिक शिक्षणापासून वंचित राहिल्या आहेत. सप्टेंबर २०२१ पासून, मुलींना सहावीच्या पुढे औपचारिक शिक्षण घेण्यापासून रोखण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर, डिसेंबर २०२२ पासून महिलांना विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. युनिसेफच्या (UNICEF) मते, अफगाणिस्तान हा जगातील एकमेव असा देश आहे जिथे मुली आणि महिलांसाठी माध्यमिक व उच्च शिक्षण पूर्णपणे अस्तित्वात नाही.


Zakir Naik Taliban girls education remark :
Damu Naik | खासदार राहुल गांधी बालिश नेते

२०२१ पासून अफगाणमध्‍ये मुले आणि मुलींना स्वतंत्र ठेवण्याचे नियम

२०२१ मध्ये पुन्हा सत्तेत आल्यानंतर, तालिबानने शाळांमध्ये मुले आणि मुलींना स्वतंत्र ठेवण्याचे नियम लागू केले. त्यांनी असाही आदेश दिला की, मुलींना शिकवण्यासाठी केवळ महिला शिक्षिकाच असाव्यात. मार्च २०२२ मध्ये मुलींसाठी माध्यमिक शाळा पुन्हा सुरू करण्याची योजना नंतर मागे घेण्यात आली.डिसेंबर २०२२ मध्ये, महिलांना सरकारी आणि खाजगी विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यावर बंदी घालण्यात आली. डिसेंबर २०२४ मध्ये, ही बंदी वैद्यकीय प्रशिक्षण संस्थांमधील महिलांच्या प्रवेशापर्यंत विस्तारण्यात आली. यामध्‍ये नर्सिंग आणि प्रसूती-सहाय्य अभ्यासक्रमांचाही समावेश आहे.

झाकीर नाईकचे सध्‍या वास्‍तव्‍य मलेशियामध्‍ये

२०१६ मध्ये बांगालादेशची राजधानी ढाका येथील दहशतवादी हल्ल्यानंतर झाकीर नाईक भारत फरार झाला आहे. त्याच्यावर UAPA (बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंधक कायदा), मनी लाँड्रिंग (आर्थिक गैरव्यवहार) आणि समाजात द्वेष पसरवण्याचे गंभीर आरोप आहेत. भारताने त्याच्या 'इस्लामिक रिसर्च फाउंडेशन' (IRF) या संस्थेवर आणि 'पीस टीव्ही' या चॅनेलवर बंदी घातली आहे. झाकीर नाईक हा सध्या मलेशियामध्ये स्थायी रहिवासी म्हणून राहत असून, भारत सरकार त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.