White House shooting | व्हाईट हाऊसबाहेर गोळीबार; स्वतःला 'येशू ख्रिस्त' म्हणणारा हल्‍लेखोर पोलीस चकमकीत ठार

हल्‍लेखोराच्‍या गोळीबारा एक नागरिक जखमी
White House shooting
अमेरिकेच्या 'व्हाईट हाऊस' (White House) कॉम्प्लेक्सबाहेर अंदाधुंद गोळीबाराची घटना घडली. पोलीस चकमकीत हल्‍लेखोर नासीर बेस्ट ठार झाला आहे.Image x
Published on
Updated on

White House shooting

वॉशिंग्टन : स्वतःला 'येशू ख्रिस्त' म्‍हणणार्‍या बंदूकधाऱ्याने शनिवारी सायंकाळी अमेरिकेच्या 'व्हाईट हाऊस' (White House) कॉम्प्लेक्सबाहेर अंदाधुंद गोळीबार केला. यानंतर अमेरिकन सिक्रेट सर्व्हिसच्या (US Secret Service) जवानांनी केलेल्या जवाबी कारवाईत हा संशयित जागीच ठार झाला. नासीर बेस्ट (वय २१) असे या मृत हल्लेखोराचे नाव आहे. अवघ्या महिन्याभरापूर्वी, 'व्हाईट हाऊस करस्पाँडंट्स डिनर'दरम्यान ट्रम्प उपस्थित असतानाच एका सशस्त्र संशयिताने गोळीबार केला होता, त्यानंतर आता ही दुसरी मोठी घटना घडली आहे.

व्‍हाईस हाऊस परिसरात प्रचंड घबराट

नासीरने व्हाईट हाऊसबाहेरील सुरक्षा चौकीवर गोळीबार केला, ज्यामुळे परिसरात प्रचंड घबराट पसरली आणि तात्काळ मोठ्या प्रमाणावर फेडरल सुरक्षा दल तैनात करण्यात आले. 'न्यू यॉर्क पोस्ट'च्या वृत्तानुसार, नासीर बेस्ट १७ व्या स्ट्रीट नॉर्थवेस्टजवळ संशयास्पद रितीने फिरताना दिसला होता. त्यानंतर त्याने अचानक रिव्हॉल्व्हर काढून तिथल्या चौकीवर तैनात असलेल्या अधिकाऱ्यांच्या दिशेने अनेक राउंड फायर केले.सिक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी तात्काळ प्रत्युत्तराखल गोळीबार करत संशयिताला जागीच ठार केले. 'द न्यू यॉर्क पोस्ट' आणि 'सीबीएस न्यूज'ने दिलेल्या माहितीनुसार, या गोळीबारात तिथे उपस्थित असलेला किमान एक नागरिक गंभीर जखमी झाला आहे. सुदैवाने, सिक्रेट सर्व्हिसचा जखमी झालेला नाही.

White House shooting
ChatGPT Murder Case |पुरुषांसोबत डेटवर जायची, नंतर चॅटजीपीटीला विचारून गोळ्या द्यायची... दोघांच्या मृत्यूने खळबळ

गोळीबाराच्‍या घटनेवेळी राष्‍ट्राध्‍यक्ष ट्रम्‍प व्हाईट हाऊसमध्‍ये

हा गोळीबार झाला तेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे व्हाईट हाऊसच्या आत होते. तिथून ते इराण आणि इतर मध्य-पूर्व देशांसोबतच्या शांतता कराराबाबत अत्यंत महत्त्वाच्या राजनैतिक चर्चेत व्यस्त होते. गोळीबाराच्या अवघ्या दोन तास आधी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल' (Truth Social) वर एक पोस्ट केली होती. त्या पोस्टमध्ये त्यांनी आपण 'ओव्हल ऑफिस'मध्ये असून इराण, इस्रायल आणि अनेक मध्य-पूर्व देशांचा समावेश असलेल्या संभाव्य शांतता करारावर काम करत असल्याचे सांगितले होते.

White House shooting
Trump-Netanyahu Disagreement | इराणबाबतच्या भूमिकेवरून ट्रम्प-नेतान्याहूंमध्ये मतभेद

हल्‍लेखोर नासीर बेस्‍ट मानसिकदृष्ट्या आजारी

प्राथमिक माहितीनुसार, तपास अधिकाऱ्यांच्या मते नासीर बेस्ट हा मानसिकदृष्ट्या आजारी होता. त्याचा यापूर्वीही कायदा अंमलबजावणी आणि फेडरल सुरक्षा यंत्रणांशी संबंध आला होता.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हाईट हाऊसच्या प्रतिबंधित प्रवेशद्वारांजवळ वारंवार घुटमळल्यामुळे तो सिक्रेट सर्व्हिसच्या रडारवर होता. या परिसरापासून दूर राहण्याच्या न्यायालयाच्या आदेशाचेही त्याने उल्लंघन केले होते.

White House shooting
US Iran Agreement : अमेरिका-इराण करार प्रक्रिया एकून तीन टप्प्यांत राबवणार

तो स्वतःला येशू ख्रिस्त म्हणवत होता

पूर्वीच्या एका घटनेच्या न्यायालयीन नोंदींवरून असे समोर आले आहे की, अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले असताना बेस्टने अत्यंत विचित्र विधाने केली होती. "तो स्वतःला येशू ख्रिस्त म्हणवत होता आणि त्याला अटक व्हायची होती," असे न्यायालयीन नोंदींमध्ये नमूद करण्यात आले आहे. जून २०२५ मध्ये १५ व्या स्ट्रीट आणि ई स्ट्रीट नॉर्थवेस्टजवळ वाहनांची वाहतूक रोखल्याबद्दल बेस्टला सक्तीने मानसिक उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. 'सीएनएन'च्या वृत्तानुसार, तेव्हा स्वतःला 'देव' म्हणवणाऱ्या बेस्टला सिक्रेट सर्व्हिसने ताब्यात घेतले होते आणि मानसिक तपासणीसाठी 'सायकियाट्रिक इन्स्टिट्यूट ऑफ वॉशिंग्टन'मध्ये पाठवले होते.

White House shooting
Who is Cole Thomas Allen? 'व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट्स डिनर'मध्ये गोळीबार करणारा कोल थॉमस ॲलन कोण आहे?

बेस्‍टच्‍या सोशल मीडिया अकाउंट्सवर अनेक आक्षेपार्ह पोस्ट

जुलै २०२५ मध्ये, एका एक्झिट टर्नस्टाईल लेनमधून प्रतिबंधित पादचारी नियंत्रण बिंदू ओलांडून व्हाईट हाऊस कॉम्प्लेक्सच्या ड्राईव्हवेमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल बेस्टला पुन्हा अटक करण्यात आली होती. या घटनेनंतर न्यायाधीशांनी त्याला व्हाईट हाऊसच्या परिसरात न येण्याचे आदेश दिले होते. तसेच, जुन्या तपासादरम्यान बेस्टच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर अनेक आक्षेपार्ह पोस्ट आढळून आल्या होत्या. मात्र, गोळीबारापूर्वी बेस्टने कधीही हिंसक वर्तन केले नव्हते किंवा त्याच्याकडे शस्त्र आढळले नव्हते, असे सुरक्षा यंत्रणांनी स्पष्ट केले.

White House shooting
PM Modi Washington shooting | 'लोकशाहीत हिंसेला स्थान नाही' : वॉशिंग्‍टनमधील गोळीबारावर PM मोदींनी व्यक्त केली चिंता

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सुरक्षा दलांचे कौतुक

२१ वर्षीय संशयित हल्लेखोराचा खात्मा करणाऱ्या 'सिक्रेट सर्व्हिस' आणि इतर कायदा अंमलबजावणी संस्थांच्या "जलद आणि व्यावसायिक" कारवाईचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कौतुक केले. एका महिन्यापूर्वी 'व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट्स डिनर'दरम्यान सुरक्षेत झालेल्या मोठ्या त्रुटीची आठवणही ट्रम्प यांनी यावेळी करून दिली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 'ट्रुथ सोशल' वरील पोस्‍टमध्‍ये त्‍यांनी म्‍हटलं आहे की, " व्हाईट हाऊसच्या गेटजवळ सिक्रेट सर्व्हिसच्या एजंट्ससोबत झालेल्या गोळीबारात हा बंदूकधारी ठार झाला आहे. जलद कारवाई केल्याबद्दल आमच्या 'सिक्रेट सर्व्हिस' आणि कायदा अंमलबजावणी संस्थांचे मनापासून आभार मानतो. "'व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट्स डिनर'मधील गोळीबाराच्या घटनेला एक महिना पूर्ण होत असतानाच ही दुसरी घटना घडली आहे. वॉशिंग्टन डी.सी.मध्ये भविष्यातील सर्व राष्ट्राध्यक्षांसाठी जगातील सर्वात सुरक्षित जागा असणे किती महत्त्वाचे आहे, हेच यावरून दिसून येते. आपल्या देशाची राष्ट्रीय सुरक्षा याची मागणी करते!"

FBI कडून तपास सुरू

फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (FBI) ने या गोळीबाराच्या घटनेच्या संयुक्त तपासाला सुरुवात केली आहे. FBI चे संचालक काश पटेल यांनी 'X' (ट्विटर) वर पोस्ट करत लिहिले की, "एफबीआय घटनास्थळी हजर असून व्हाईट हाऊस परिसराजवळ झालेल्या गोळीबाराच्या घटनेत सिक्रेट सर्व्हिसला मदत करत आहे."

White House shooting
DONALD TRUMP |युद्धात मदतीस नकार अन् ट्रम्प यांचा वार..! थेट फ्रान्सच्या फर्स्ट लेडींचे 'घरगुती' भांडणच आणले चव्हाट्यावर

व्हाईट हाऊसबाहेर प्रचंड दहशत

गोळीबाराच्या आवाजामुळे व्हाईट हाऊसबाहेर उपस्थित असलेल्या पत्रकारांमध्ये एकच गोंधळ उडाला. 'एबीसी न्यूज'च्या बातमीदार सेलिना वांग यांनी सांगितले की, 'डझनभर गोळ्या' चालल्यासारखा आवाज आल्यानंतर पत्रकारांना जीव वाचवण्यासाठी पळावे लागले. वांग यांनी 'X' वर लिहिले: "मी व्हाईट हाऊसच्या नॉर्थ लॉनवरून सोशल मीडिया व्हिडिओसाठी माझ्या आयफोनवर रेकॉर्डिंग करत होते, तितक्यात गोळीबाराचा आवाज आला. तो डझनभर गोळ्या चालल्यासारखा आवाज होता."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news