Vishal Garg Fired : Zoom कॉलवर ९०० जणांना नोकरीवरुन काढणारे भारतीय वंशाचे CEO आता स्वतःच बडतर्फ

पदावर पुनर्नेमणुकीसाठी विशाल गर्ग आता कायदेशीर लढा लढणार
Vishal Garg fired Better.com
Vishal Garg fired Better.com Pudhari
Published on
Updated on

Vishal Garg fired Better.com : डिसेंबर २०२१ मध्ये एका अवघ्या काही मिनिटांच्या Zoom व्हिडिओ कॉलवरून तब्बल ९०० कर्मचार्‍यांना एकाच वेळी नारळ देत जगभरात कुप्रसिद्ध ठरलेले 'Better.com' या कंपनीचे भारतीय वंशाचे सह-संस्थापक विशाल गर्ग पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ज्या पद्धतीने त्यांनी कर्मचार्‍यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता, तसाच दणका आता त्यांना स्वतःला बसला आहे. Better Home & Finance कंपनीच्या संचालक मंडळाने विशाल गर्ग यांची CEO पदावरून तडकाफडकी हकालपट्टी केली असून, आता त्यांनी स्वतःला पूर्वपदावर घेण्याची मागणी करत कायदेशीर लढा सुरू केला आहे.

गर्ग यांना कंपनीने केले पदमुक्त

३ ऑगस्ट रोजी गर्ग यांना पदमुक्त करून त्यांच्या जागी डॅनियल लुईस यांची नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती करण्यात आली.

Vishal Garg fired Better.com
Ronaldo Breaks Instagram Record : 'मेस्सीसाठी रोनाल्डोची ती एक कमेंट...' अन् इंस्टाग्रामवर रचला गेला नवा इतिहास!!

'माझा विश्वासघात झाला', गर्ग यांचा आरोप

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विशाल गर्ग यांनी संचालक मंडळ आणि नवीन सीईओ डॅनियल लुईस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गर्ग यांच्या दाव्यानुसार, हेज फंड व्यवस्थापक असलेल्या डॅनियल लुईस यांनी गेल्या सहा महिन्यांत सोशल मीडिया आणि वैयक्तिक संवादातून कंपनीच्या धोरणांचे कौतुक करत त्यांचा विश्वास संपादन केला.

Vishal Garg fired Better.com
Omar Abdullah on PoK : "...तर पाकव्याप्त काश्मीर भारतात विलीन झाला असता": जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांचा दावा

बोर्डाने घेतला अत्‍यंत चुकीचा निर्णय घेतलाचा दावा

"लुईस यांनी खर्चात कपात करण्याबाबत चांगल्या कल्पना मांडल्या होत्या, परंतु नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाबाबत त्यांच्याकडे कोणतेही धोरण नव्हते. संचालक मंडळाची दिशाभूल करून त्यांनी मला पदावरून हटवायला लावले. बोर्डाने हा अत्यंत चुकीचा निर्णय घेतला आहे," असा दावा गर्ग यांनी केला आहे.२७ जुलै रोजी लुईस यांचा संचालक मंडळात समावेश करण्यात आला आणि अवघ्या आठवडाभरात त्यांनी इतर संचालकांना राजी करून गर्ग यांची गच्छंती घडवून आणली.

Vishal Garg fired Better.com
Sonam Wangchuk : "२०१४ मधील आश्‍वासनाची पूर्तता करा..." : सोनम वांगचुक यांनी PM मोदींकडे नेमकी कोणती मागणी केली?

पुनर्नेमणुकीसाठी कायदेशीर नोटीस

विशाल गर्ग यांनी प्रख्यात वकील ॲलेक्स सॅपिरा यांची नियुक्ती केली असून, कंपनीच्या संचालक मंडळाला पत्राद्वारे आपल्याला पुन्हा सीईओ पदावर सन्मानाने बहाल करण्याची मागणी केली आहे."मी गेली १० वर्षे ही कंपनी चालवली आहे. कामात काही चुका झाल्या असतील, पण कंपनीचे भविष्य अजूनही उज्ज्वल आहे आणि हा वाद लवकरच सुटेल अशी मला आशा आहे," असा विश्वास गर्ग यांनी व्यक्त केला.

काय होते २०२१ मधील ते वादग्रस्त प्रकरण?

डिसेंबर २०२१ मध्ये विशाल गर्ग यांनी Better.com मधील तब्बल ९०० कर्मचार्‍यांना एकाच Zoom कॉलवर एकत्र आणून, 'तुम्हाला तातडीने कामावरून कमी करण्यात येत आहे' अशी घोषणा केली होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता आणि गर्ग यांच्या वर्तनावर जगभरातून तीव्र टीका झाली होती. कामातील कार्यक्षमता आणि उत्पादकतेचे कारण देत त्यांनी कंपनीतील सुमारे ९ टक्के मनुष्यबळ एका झटक्यात कमी केले होते. यामध्ये कंपनीच्या संपूर्ण 'डायव्हर्सिटी, इक्विटी अँड इनक्लुजन' टीमचाही समावेश होता. एवढेच नव्हे तर कामाचे तास वाढवून दाखवून कर्मचाऱ्यांनी कंपनीची फसवणूक केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी त्यावेळी केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news