Ronaldo Breaks Instagram Record : 'मेस्सीसाठी रोनाल्डोची ती एक कमेंट...' अन् इंस्टाग्रामवर रचला गेला नवा इतिहास!!

रोनाल्‍डोची पोस्‍ट ठरली इन्स्टाग्रामच्या इतिहासातील 'मोस्ट लाईक्ड कमेंट'
Ronaldo Breaks Instagram Record
Ronaldo Breaks Instagram Record Pudhari
Published on
Updated on

Ronaldo breaks Instagram Comment record : फुटबॉल जगतातील महान खेळाडू लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज मेस्सी यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी निधन झाले. या कठीण काळात मेस्सीच्या पाठीशी ठामपणे उभे राहत त्याचा मैदानातील आजवरचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी क्रिस्टियानो रोनाल्डोने पाठवलेला सांत्वनपर इन्‍स्‍टाग्राम पोस्‍ट सध्या जगभरातील चाहत्यांची मने जिंकत आहे. रोनाल्डोच्या एका भावूक कमेंटने आता इन्स्टाग्रामच्या इतिहासातील 'मोस्ट लाईक्ड कमेंट' ( आजवरची सर्वाधक लाईक्स मिळालेली कमेंट) होण्याचा नवा जागतिक विक्रम केला आहे.

Pudhari

काय म्हणाला होता रोनाल्डो?

वडिलांच्या निधनानंतर मेस्सीने सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टवर प्रतिक्रिया देताना रोनाल्डोने लिहिले, "लिओ, या अत्यंत कठीण प्रसंगी तुझ्या आणि तुझ्या कुटुंबाच्या दुःखात मी सहभागी आहे. तुला आणि तुझ्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्यासाठी बळ मिळो, हीच प्रार्थना."

तीन दिवसांमध्‍ये तब्‍बल ६४ लाखांहून अधिक लाईक्‍स

रोनाल्डोच्या या हृदयस्पर्शी कमेंटला अवघ्या तीन दिवसांत तब्बल ६४ लाखांहून (६.४ मिलियन) अधिक लाईक्स मिळाले असून हा आकडा ६५ लाखांच्या जवळ पोहोचला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याही कमेंटला मिळालेले हे सर्वाधिक लाईक्स ठरले आहेत.

Ronaldo Breaks Instagram Record
Supreme Court : "बड्या कंपन्यांच्या दबावाला बळी पडत आहात का?" पॅकबंद अन्नावरील 'वॉर्निंग लेबल्स'बाबत सुप्रीम कोर्ट संतप्त

रोनाल्डोने स्वतःचाच जुना विक्रम काढला मोडला

विशेष म्हणजे, इन्स्टाग्रामवर सर्वाधिक लाईक्स मिळालेल्या कमेंटचा यापूर्वीचा विक्रमही क्रिस्टियानो रोनाल्डोच्याच नावावर होता. २०२४ मध्ये फ्रान्सचा स्टार स्ट्रायकर कायलियन एम्बाप्पेने रिअल माद्रिद क्लबमध्ये प्रवेश केला होता, तेव्हा रोनाल्डोने त्याचे अभिनंदन करताना लिहिले होते, "आता माझी पाहण्याची वेळ आहे. तू बर्नाब्यू स्टेडियम गाजवताना पाहण्यासाठी मी उत्सुक आहे." या कमेंटने २०२५ च्या उत्तरार्धात ६० लाख (६ मिलियन) लाईक्सचा टप्पा ओलांडला होता. आता स्वतःचाच हा विक्रम रोनाल्डोने मोडीत काढला आहे.

Ronaldo Breaks Instagram Record
Mumbai AC Local Train : मुंबईकरांसाठी खुशखबर ! पुढील वर्षापासून धावणार नव्या २३८ एसी लोकल
Pudhari

'बाबा, तुझ्याशिवाय पुढे कसे खेळू?' : मेस्सीची हृदयद्रावक पोस्ट

वडिलांच्या निधनानंतर मेस्सीने अत्यंत दुःखी अंतकरणाने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. मेस्सीने आपल्‍या पोस्‍टमध्‍ये लिहिलं आहे की, "बाबा, तुम्‍ही आम्हाला सोडून गेला, यावर माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. आता मी तुम्‍हाला कधीच पाहू शकणार नाही, आपल्यात कधीच गप्पा होणार नाहीत, या विचारानेच मन सुन्न झाले आहे. तू खूप वेदना सहन करत होतास आणि आता या त्रासातून मुक्ती मिळाली, हे मला ठाऊक आहे, पण तू खूप लवकर गेलास. आपल्या दोघांना अजून एकत्र अनेक क्षण जगायचे होते. गेल्या वर्ल्ड कपमध्ये मी खेळावे अशी तुझी खूप इच्छा होती; पण स्पर्धा सुरू होण्याच्या काही दिवस आधीच तुझी प्रकृती खालावली. माझी कोणतीही मोठी स्पर्धा तू पाहिली नाहीस, असे पहिल्यांदाच घडले होते."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news