

Viral News Update : फोनवर बोलण्याची आपल्या प्रत्येकाची एक स्टाइल असते. कधी काही विशिष्ट शब्द उच्चारले जातात. कधी निरोप घ्यायची पद्धत वेगळी असते. तर कधी फोन उचलताना विशिष्ट शैलीत greet केले जाते. पण अनेकदा बोलताना असे काही तोंडातून निघून जाते की आपणही काहीवेळ विचारात पडतो.
आताही Reditt या प्लॅटफॉर्मवर असाच एक किस्सा शेयर होतो आहे. जो म्हणली तर एक चूक किंवा म्हणले तर Sleep of Toung असू शकली असती.
पण या सगळ्या गोंधळाला तारले आहे ते एका छान मेलने. एका रेडिट वापरकर्त्याने ही घटना सांगितली ती अशी होती की, एका महत्त्वाच्या क्लाईंटसोबत प्रोफेशनल कॉल सुरू असताना या कॉलचा शेवट त्याने चुकून I Love You असे बोलून केला. त्याला अचानक त्याची चूक लक्षात आली.
फोन कट करताना त्याच्या लक्षात आले की क्लायंट हसत होता. हे सगळे घडून गेल्यानंतर तुमच्या आमच्या सारखाच तो एम्प्लॉयीपण जाम घाबरला.
हे सगळं अनप्रोफेशनल घडलं असताना त्या क्लायंटच्या तक्रारीचा खरमरीत मेल येईल आशा अपेक्षेत बसलेल्या एम्प्लॉयीबाबत घडलं मात्र वेगळेच.
या एम्प्लॉयीला मेल आला खरा.. पण त्यातील शब्द पाहून कुणालाही कौतूक वाटेल. या मेलमध्ये लिहिले होते, हाय, फक्त इतकंच सांगायचं होतं की तू कॉलच्या शेवटी चुकून ‘लव्ह यू’ म्हटलं होतंस, तेव्हा मी तुझ्यावर हसलो नव्हतो. मला ते फक्त गंमतीशीर वाटलं कारण मी स्वतःही असं पूर्वी केलं आहे, आणि मला माहिती आहे की अशा गोष्टी घडतात. मला आनंद आहे की तुझ्या आयुष्यात इतकं प्रेम आहे की अशा प्रकारची प्रतिक्रिया तुझ्याकडून सहजपणे येते. खरं तर, यासाठी तुला अभिमान वाटला पाहिजे.
आता एम्प्लॉयीने या मेलचा स्क्रीनशॉट शेयर केल्यावर नेटीझन्सनी कमेंट आणि आठवणींचा पाऊस पाडला नसता तर नवलच.
एक युजर म्हणतो, हे तर काहीच नाही, मी माझ्या बॉसला एकदा चुकून Honey (हनी) म्हंटलं होतं. तर एकाने शेयर केले की एकदा मी माझ्या शिक्षिकेला आई अशी हाक मारली होती.