

Delhi wedding story : लग्नसमारंभात येणारे ट्विस्ट सिनेमात आपण बरेचदा पाहतो. पण दिल्ली येथे पार पडलेल्या विवाहसोहळ्यात एक असा ट्विस्ट आला की सगळेच आश्चर्यचकित झाले. दिल्ली येथे एक लग्नाचे विधी सुरू होते. दरम्यान यावेळी डिजेने चन्ना मेरेया हे इमोशनल बॉलिवूड गाणे लावले. यावेळी नवरा मुलगा एक्स गर्लफ्रेंडच्या आठवणीत इतका भावुक झाला की लग्नाचे विधी अर्ध्यातच सोडून निघून गेला.
कुणाला काही कळायच्या आतच हा प्रकार घडला. नवरदेव निघून जाताच त्यासोबत असलेले वऱ्हाडही निघून गेले. ए दिल है मुश्किल सिनेमातील हे गाणे heart break song म्हणूनही ओळखले जाते. जसे हे गाणे सुरू झाले नवरदेवाने लग्नातून काढता पाय घेतला. उत्सवमूर्तीच निघून गेल्याचे पाहाताच. मुलाकडचे नातेवाईकही पांगले.
Instagram वरील एका पेजवरुन या घटनेची माहिती मिळाली. अर्थात नेटीझन्सच्या यावरील कमेंट्सही तितक्याच भन्नाट होत्या. एक यूझर यावर कमेंट करताना म्हणतो की या डिजेचे आभार मानले पाहिजेत ज्याने या नवरदेवाला खऱ्या फीलिंग्ज ओळखण्यास मदत केली. तर दूसरा यूझर म्हणतो, ‘ हे गाणे प्रत्येक भारतीय लग्नात वाजवले गेले पाहिजे.
ए दिल है मुश्किल या सिनेमातील गाण्यात रणबीर कपूर, अनुष्का शर्मा आणि फवाद खान आहेत. अनुष्काच्या प्रेमात पडलेला रणबीर तिच्या लग्नात हे गाणे गाताना दिसतो. त्याच्या अपूर्ण प्रेमाची झलक या गाण्यात दिसून येते. हे गाणे अरिजित सिंगने गायले आहे.