Viral Tech News : दोघांमध्‍ये AI 'तिसरा', तिने थेट बॉयफ्रेंडशी नाते तोडले! व्‍हायरल पोस्‍ट चर्चेत; नेमकं काय घडलं?

"माझं प्रेम एका कॉम्प्युटर प्रोग्रामवर होतं!" AI ने मॅनेज केलेल्या नात्याचा झाला अखेर शेवट
Viral Tech News
प्रतिकात्‍मक छायाचित्र.AI-generated image
Published on
Updated on

Viral Tech News : नात्यात जेव्हा 'तिसरा' कोणी येतो, तेव्हा विश्वासाची वीण उसवायला लागते. आजवर आपण माणसांमधील 'तिसऱ्या' व्यक्तीमुळे संसार आणि प्रेमाचे नातं उद्‍ध्‍वस्‍त झाल्याचं ऐकलंय, पाहिलं आणि हेच वास्तव आहे. पण, जर हा 'तिसरा' कोणी रक्तामांसाचा माणूस नसून थेट आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) असेल तर? हे खरंच घडलंय!AI च्या हस्तक्षेपामुळे प्रियकर-प्रेयसीच्या नात्यात अशी दरी निर्माण झाली की, प्रेयसीने थेट ब्रेकअपचाच मार्ग निवडला. सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होणाऱ्या एका पोस्टने हा खळबळजनक प्रकार समोर आणला आहे.

सॅन फ्रान्‍सिस्‍कोमधील अजब प्रकार

डिजिटल युगात प्रेमाच्या व्याख्या बदलत चालल्या आहेतजोडीदार तुमच्यावर प्रेम करत नसून, त्याला 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (AI) कडून मिळणाऱ्या सूचनांनुसार वागत असेल तर? असाच एक अजब आणि थक्क करणारा प्रकार अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को (SF) येथे समोर आला असून, AI मुळे तरुणीने तिच्या बॉयफ्रेंडसोबतचं नातं थेट तोडून टाकलं आहे.

Viral Tech News
AI Virus | ‘एआय’ने प्रयोगशाळेत पहिल्यांदाच बनवला नवा व्हायरस! मानवाला धोका की वैद्यकीय क्षेत्रासाठी वरदान?

‘माझी मैत्रीण एका कॉम्प्युटर प्रोग्रामच्या प्रेमात होती’

डे लिया लाझारेस्कू (Delia Lazarescu) हिने 'X' वर ही घटना शेअर केली आहे. तिने आपल्‍या पोस्‍टमध्‍ये लिहिलंय, "माझ्या जवळच्‍या मैत्रिणीने तिच्या बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप केलं. मी जेव्हा तिला याचं कारण विचारलं, तेव्हा तिने सांगितलं की, तिचा बॉयफ्रेंड हे संपूर्ण नातं मॅनेज करण्यासाठी एका 'AI एजंट'चा वापर करत होता! त्याचे ते काळजीयुक्त मेसेज, विचारपूस करणं, गुड मॉर्निंगचे मेसेज, भांडण झाल्यावर ते मिटवणं, डिनर डेट प्लॅन करणं... हे सगळं स्वतः तो करत नव्हता, तर ते ऑटोमेटेड (AI द्वारे) होतं. माझी मैत्रीण एका माणसाच्या नाही, तर कॉम्प्युटरच्या 'क्रॉन जॉब'च्या (स्वयंचलित प्रोग्रामच्या) प्रेमात पडली होती."

व्‍हायरल पोस्‍टवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. नेटकऱ्यांनी यावर आश्चर्य, राग आणि विनोदी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्‍हटलं की, "त्‍याने लव्ह लाईफचं आऊटसोर्सिंगच करून टाकलं!" आणि "हे तर AI ने जनरेट केलेलं प्रेम निघालं!" अशा कमेंट्स युजर्सनी केल्या आहेत.

Viral Tech News
AI Brain Aging Study : मेंदूच्या वेगवेगळ्या भागांच्या वयाचा अंदाज बांधणारे ‘AI’ तंत्रज्ञान विकसित, नवीन संशोधनात काय आढळलं?

हे अत्यंत भयंकर आहे...

एका युजरने संताप व्यक्त करत लिहिले, "हे अत्यंत भयंकर आहे. त्याने स्वतःच्या भावनिक जबाबदाऱ्या एका अल्गोरिदमला (AI) दिल्या आणि तरीही त्याला प्रेमाचं श्रेय हवं होतं? हे अजिबात सहन करण्यासारखं नाही.""श्रीमंतांच्या नोकरांसारखंच तर आहे:" दुसरीकडे, काहींनी बॉयफ्रेंडची बाजूही घेतली. एका युजरने लिहिले, "एखादा श्रीमंत व्यक्ती आपल्या नोकराकरवी गर्लफ्रेंडला फुलं पाठवतो तेव्हा ते रोमँटिक वाटतं. पण AI ने काळजीयुक्त मेसेज पाठवले की ते भयानक वाटतं? हा दुटप्पीपणा आहे."

Viral Tech News
Google Earth AI tool : गुगलने काही तासांतच बंद केले Earth AI टूल! काय आहे कारण?

असेही कपल...

एका युजरने सॅन फ्रान्सिस्कोमधीलच एका कपलचं उदाहरण देताना सांगितले, "माझ्या ओळखीचं एक कपल आहे. ते दोघेही डेट्स, कॉल्स, रोमान्स आणि मेसेजेस प्लॅन करण्यासाठी AI एजंट्स वापरतात आणि दिवसाच्या शेवटी दोघेही AI ने काय काम केलं ते चेक करतात." एकूच या व्‍हायरल पोस्‍टमुळे नात्यातील भावनांसाठी लोक आता 'स्वयंचलित तंत्रज्ञानावर' किती घातकपणे अवलंबून राहत आहेत, यावर या घटनेमुळे मोठी चर्चा सुरू झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news