

Fugitive Economic Offender Vijay Mallya Arun Jaitley Meeting
नवी दिल्ली : मी पळपूटा नाही. तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटलींना सांगून देश सोडला, मला चोर म्हणणे चुकीचे आहे, कारण 6200 कोटींच्या बदल्यात बँकांनी 14000 कोटी वसुल केलेत, असा दावा विजय मल्ल्या याने केला आहे. बँकांसोबत सेटलमेंट करण्याचा विचार करत असतानाच पासपोर्ट रद्द झाला आणि परदेशात अडकल्याचेही त्याने सांगितले. यूट्यूबर राज शमानी याच्यासोबत पॉडकास्टमधून ही माहिती समोर आली आहे.
विजय माल्या एकेकाळी भारतात यश, वैभव आणि लक्झरीचे प्रतीक मानले जात होते, आज 6200 कोटी रुपयांच्या बँक कर्ज फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ते अडकले आहेत.
नऊ वर्षांनंतर प्रथमच माध्यमांसमोर आलेल्या माल्यांनी, यूट्यूबर राज शमानी याच्याशी चार तासांच्या पॉडकास्टमध्ये आपले जीवन, व्यवसाय, किंगफिशर एअरलाइन्सचे अपयश, कर्मचाऱ्यांचे थकीत पगार आणि कायदेशीर लढाई यावर मोकळेपणाने चर्चा केली.
सध्या माल्या लंडनमध्ये आपल्या सहा कुत्र्यांसोबत वेळ घालवतात. त्यांचे उत्पन्न विदेशी दारू कंपन्यांमधून येते. ते म्हणतात, “मी कायदेशीर लढा देत आहे. जर मला न्याय्य सुनावणी मिळाली, तर भारतात परतण्याचा विचार करेन. तुरुंगात जाणे माझ्या नशिबात असेल, तर त्याचाही सामना करेन.”
किंगफिशर एअरलाइन्सच्या आर्थिक अडचणी जागतिक अर्थव्यवस्था ढासळल्यानंतर वाढत गेल्या. माल्या म्हणाले, तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली. मी प्रणव मुखर्जी यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितले की किंगफिशर एअरलाइन्सचे ऑपरेशन्स कमी करावे लागतील, काही विमाने बंद करावी लागतील आणि कर्मचाऱ्यांना कमी करावे लागेल. कारण मला एवढे खर्च परवडणार नाहीत.
मात्र हा प्रस्ताव नाकारण्यात आला. मला सांगण्यात आले की, ऑपरेशन कमी करू नका. तुम्ही काम सुरूच ठेवा, बँका तुम्हाला सहकार्य करतील.
माल्यांनी 17 बँकांकडून एकूण 6203 कोटींचे कर्ज घेतले. मात्र त्यांचा दावा आहे की बँकांनी त्यांच्या संपत्तीतून 14131.6 कोटी रुपये वसूल केले. म्हणजे मूळ कर्जाच्या दीडपटपेक्षा जास्त. मी 2012 ते 2015 या काळात चार वेळा सेटलमेंट ऑफर दिल्या, त्यात 5000 कोटींचा प्रस्तावही होता. पण बँकांनी नाकारले.” सध्या कर्नाटक उच्च न्यायालयाकडे वसुलीचा हिशेब मागत आहेत.
CBI ने त्यांच्यावर ब्रँड व्हॅल्युएशन आणि खासगी जेटच्या गैरवापराचे आरोप माल्या यांनी नाकारले. ED ने त्यांच्यावर 3547 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंगचे आरोप लावले, पण ते म्हणतात, “एअरलाइन्सच्या 50% खर्चासाठी विदेशी चलन वापरणे मनी लॉन्ड्रिंग नाही.” त्यांनी IDBI बँकेचे 900 कोटींचे कर्ज फेडल्याचेही सांगितले.
माल्या 2 मार्च 2016 रोजी जिनिव्हामधील FIA मिटिंगसाठी लंडनला गेले. ते म्हणाले, “मी अरुण जेटलींना सांगितले होते की मी जात आहे आणि सेटलमेंटची चर्चा करणार आहे. पण पासपोर्ट रद्द झाल्यामुळे अडकलो. मी भगोड़ा नाही. ही काही पळून जाण्याची योजना नव्हती. मला चोर म्हणणे चुकीचे आहे.”
माझी ओळख एका कष्टाळू उद्योगपती म्हणून व्हावी, जो 1.75 लाख कोटी रुपयांची बाजारपेठ निर्माण करू शकतो – चोर म्हणून नव्हे. किंगफिशर अपयशी ठरली, पण मी माझ्यापरीने संपूर्ण प्रयत्न केला. भारतात व्यवसाय फसला की तो फसवणूक ठरवला जातो.”
2015 मध्ये माल्यांनी आपल्या 60 व्या वाढदिवसानिमित्त भव्य पार्टी केली, ज्यात प्रसिद्ध गायक एनरिक इग्लेसियसने परफॉर्म केले होते. त्यामुळे वाद निर्माण झाला होता. माल्या म्हणाले, “किंगफिशर 2012 मध्येच बंद झाली होती. ही पार्टी मी माझ्या खिशातून भरली होती. जर लंडनमध्ये केली असती, तर कदाचित कोणालाही कळले नसते.”
कर्मचाऱ्यांच्या थकीत पगारांबाबत माल्यांचे उत्तर माल्यांनी कबूल केले की किंगफिशर एअरलाईन्सच्या काही कर्मचाऱ्यांना पगार देता न आल्याचे त्यांना दुःख आहे.
ते म्हणाले, “माझ्याकडे कोणताही कारण नाही. मला वाईट वाटते.” त्यांनी 260 कोटी रुपये रिलीज करण्यासाठी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, पण बँकांनी आक्षेप घेतला. संपत्ती फ्रीझ झाल्यामुळे निधी उभारता आला नाही.