

USA tourists social media history check: युनायडेट स्टेट्समध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्यां प्रवाशांना देखील त्यांच्या पाच वर्षाची सोशल मीडिया हिस्ट्री सादर करावी लागण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील ट्रम्प प्रशासन युकेसह जवळपास १२ देशांतील नागरिकांसाठी हा नवा नियम करण्याची शक्यता आहे. याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडे असल्याची माहिती अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
हा नियम १२ देशातील त्या नागरिकांना लागू होण्याची शक्यता आहे जे नागरिक ९० दिवसांच्या व्हिसाशिवाय अमेरिकेला भेट देणार आहेत. त्यांना अमेरिकेत प्रवेशापूर्वी त्यांना त्यांची पाच वर्षाच्या सोशल मीडिया हिस्ट्री सादर करायला सांगितली जाऊ शकते.
जेव्हापासून डोनाल्ड ट्रम्प हे दुसऱ्यांदा राष्ट्रपती म्हणून निवडून आले आहेत तेव्हापासून ते दुसऱ्या देशातून येणाऱ्या नागरिकांबाबत अत्यंत कडक भूमिका घेत आहेत. ते राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत अनेक नवे अन् कडक नियम लागू करत आहेत.
विश्लेषकांच्या मते डोनाल्ड ट्रम्प यांची ही नवी योजना संभाव्य पर्यटकांसाठी मोठा अडसर ठरणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या डिजीटल अधिकारांना देखील ठेच पोहचणार आहे. यामुळे अमेरिकेतील पर्यटनात मोठी घट होण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मते ही काळजीची गोष्ट नाही.
बुधवारी बोलताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, 'असं काही होणार नाही पर्यटनाच्या बाबतीत आम्ही चांगली कामगिरी करू. आम्ही लोकांनी सुरक्षितरित्या इथं यावं. आम्हाला सुरक्षितता हवी आहे. आम्ही आमच्या देशात कोणत्याही चुकीच्या व्यक्तीला प्रवेश देणार नाहीये.'
पुढच्या वर्षी अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर विदेशी पर्यटक येण्याची शक्यता आहे. कारण याच वर्षी अमेरिका कॅनडा आणि मॅक्सिको हे फिफा वर्ल्डकपचे आयोजन करणार आहेत. त्याच्या पुढच्या वर्षी २०२८ ला लॉस एंजल्समध्ये ऑलिम्पिक देखील होणार आहे.