Goa Night Club Fire: रोमियो लेन दुर्घटनेनंतर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी गोव्यात बेकायदेशीर क्लबवर अखेर हातोडा

Goa Night Club Fire: मुख्यमंत्री : लुथरा बंधूही लवकरच जेरबंद होणार; केंद्र व राज्य सरकारच्या यंत्रणा सक्रिय
Goa Night Club Fire
Goa Night Club Fire
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

हडफडे येथील रोमियो लेन क्लबमध्ये झालेल्या दुर्घटनेची गंभीर दखल गोवा सरकारने घेतली आहे. गोवा हे पर्यटन राज्य असल्यामुळे अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी किनारी भागातील बेकायदेशीर बांधकामे पाडण्यास सुरुवात झाली आहेत. लुथरा बंधूंच्या क्लबचे अतिक्रमण पाडण्यास सुरुवात झाली आहे.

Goa Night Club Fire
Goa Nightclub Fire Case | लुथरा बंधू लवकरच जेरबंद ! मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती

लुथरा बंधू विदेशात पळाले असले तरी राज्य सरकारने केंद्र सरकारच्या एजन्सी सोबत संपर्क ठेवून तपास सुरू केला असून लवकरच ते जेरबंद होतील, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.

बुधवारी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पर्यटनमंत्री रोहन खंवटे, मुख्य सचिव डॉ. व्ही. कांदावेलू, पोलिस प्रमुखांसह पर्यटन उद्योगातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन विविध निर्णय घेतले. या बैठकीनंतर बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, गोवा हे पर्यटन राज्य असल्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षा पुरवणे हे सरकारचे कर्तव्य ठरते. घडलेली घटना दुर्दैवी आहे.

Goa Night Club Fire
Ponda Accident | चालक खाली उतरताच ट्रक झाला न्यूट्रल; फर्मागुडीमध्ये मालवाहू ट्रकचा अपघात

मात्र, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी गोवा सरकार सतर्क झाले आहे. न्याय दंडाधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली तपास समिती स्थापन केली आहे. त्या समितीचा अहवाल आल्यानंतर जी नियमबाह्य आणि बेकायदेशीर बांधकामे आहेत ती पाडली जातील. कोणाचाही मुलाहिजा पाळला जाणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्याचबरोबर राज्यातील विविध पर्यटन व्यवसाय, उद्योगांच्या तपासणीसाठी खास सुरक्षा समिती नेमण्यात आलेली असून त्यामध्ये महसूल सचिव, पोलीस महानिरीक्षक, संयुक्त अर्थ सचिव आणि अग्निशमन दलाच्या संचालकांचा समावेश आहे.

ही समिती कॅसिनोसह राज्यातील पर्यटन स्थळावरील सुरक्षेची तपासणी करेल, असे सांगून आतापर्यंत रोमियो लेन क्लबमध्ये झालेल्या अग्नीकांड प्रकरणी ६ जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. सर्व खात्यांना सतर्क करण्यात आलेले असून विविध पर्यटन व्यवसायांचे परवाने तपासण्यास सुरुवात झालेली आहे. ज्यांच्याकडे योग्य परवाने नाहीत, त्यांच्यावर कारवाई करताना बेकायदेशीर बांधकामे त्वरित मोडण्याची कारवाई सुरू होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Goa Night Club Fire
Goa Night Club Fire: लोकं होरपळत असताना परदेशात पळून जाणारे लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात; प्रत्यार्पण प्रक्रिया सुरू

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यातील महत्त्वाचे मुद्दे

न्यायदंडाधिकाऱ्यांचा अहवाल आल्यानंतर न्यायालयीन चौकशीबाबत विचार. माजी आयपीएस अधिकाऱ्याने कारवाई रोखल्याचे तपासात आवळले तर कारवाई अग्निशमन सुविधा व उपकरणे नाहीत ती आस्थापने त्वरित बंद पर्यटकांच्या सुरक्षेवर भर देणार

... तर अधिकाऱ्यांना अटक

दरम्यान, क्लब जळीतकांड प्रकरणी निलंबित करण्यात आलेले अधिकारी चौकशीला आले नाहीत, तर त्यांना अटक होऊ शकते, असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नावर बोलताना दिले.

दुर्घटनेची दखल घेऊन सुरक्षेवर भर

पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले की, गोवा हे पर्यटन राज्य असल्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांची सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी घडलेल्या दुर्घटनेची दखल घेऊन गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षितता प्रदान करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

पर्यटकांच्या सुरक्षेवर भर दिला जात आहे. बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई सुरू झाली आहे. पॅराग्लायडिंगसारख्या उपक्रमांसाठी कडक नियम करण्यात आले आहेत. गोवा पर्यटनासाठी सुरक्षित आहे.

- रोहन खवंटे, मंत्री, पर्यटन खाते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news