Donald Trump Attack | डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा इराणचा कट?; हल्ल्याआधीच मिळाली होती गुप्त माहिती

इराणला करायची आहे डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या
Donald Trump Attack
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर १३ जुलै रोजी प्राणघातक हल्ला झाला होता.Twiiter
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन नेते डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागे (Donald Trump Attack) इराणचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न करण्याचा इराणने कट रचल्याची गुप्त माहिती अलिकडच्या आठवड्यात अमेरिकन अधिकाऱ्यांना मिळाली होती. या पार्श्वभूमीवर सिक्रेट सर्व्हिसने ट्रम्प यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे, असे सीएनएनने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

थॉमस मॅथ्यू क्रूक्सचा इराणी कटाशी संबंध?

१३ जुलै रोजी पेनसिल्व्हेनिया येथील निवडणूक प्रचार सभेत ट्रम्प यांच्यावर हल्ला झाला होता. ट्रम्प प्रचार सभेत भाषण करत असताना २० वर्षीय तरुण थॉमस मॅथ्यू क्रूक्सने त्‍यांच्‍यावर ८ गोळ्या झाडल्या. ट्रम्‍प या प्राणघातक हल्‍ल्‍यातून थोडक्‍यात बचावले. पण त्‍यांच्‍या उजव्या कानाला गोळी चाटून गेली. त्यामुळे ते जखमी झाले. दरम्यान, ट्रम्प यांची हत्या करण्याचा प्रयत्न करणारा २० वर्षीय थॉमस मॅथ्यू क्रूक्सचा इराणी कटाशी संबंध असल्याचे कोणतेही संकेत मिळालेले नाहीत, असेही पुढे वृत्तात म्हटले आहे.

Donald Trump Attack
Donald Trump | डोनाल्ड ट्रम्प यांना दीर्घायुष्य लाभो! हिंदू सेनेनं केलं होम- हवन

नेमके काय घडले होते?

पेनसिल्व्हेनियामध्ये ट्रम्प यांच्यावर अचानक गोळीबार झाला. हल्लेखोराने ट्रम्प यांच्या दिशेने अनेक राउंड गोळीबार केला. त्यातील एक गोळी ट्रम्प यांच्या उजव्या कानाला चाटून गेली. या हल्ल्याला सुरक्षा रक्षकांनी चोख प्रत्युत्तर दिले. त्यांनी ट्रम्प यांना वाचवले आणि २० वर्षीय हल्लेखोराला ठार केले.

इराणने आरोप फेटाळले

पण, इराणने त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी हे आरोप निराधार आणि द्वेषपूर्ण असल्याचे म्हटले आहे. "इराणच्या मते ट्रम्प हे गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर जनरल सुलेमानी यांची हत्या करण्याचा आदेश दिल्याबद्दल न्यायालयात खटला चालवला गेला पाहिजे आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजे. इराणने त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब केला आहे," असे संयुक्त राष्ट्रातील इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या स्थायी मिशनच्या प्रवक्त्याने सीएनएनशी बोलताना सांगितले.

Donald Trump Attack
Baba Vanga-Donald Trump | 'ट्रम्प यांच्यावर हल्ला ! बाबा वेंगांचे भाकीत ठरले खरे

इराणच्या कटाची माहिती कोणी दिली?

इराणच्या कटाची माहिती एका मानवी स्त्रोताकडून मिळाली होती, असेही वृत्तात नमूद केले आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले की, पेनसिल्व्हेनिया सभेपूर्वी सिक्रेट सर्व्हिस आणि ट्रम्प प्रचार यंत्रणेला धोक्याची जाणीव करून देण्यात आली होती. त्यानंतर सिक्रेट सर्व्हिसने ट्रम्प यांच्या सुरक्षेत वाढ केली, असे अधिकाऱ्याने सांगितले.

इराण ट्रम्प यांचा बदला घेईल, अमेरिकेला भीती

ट्रम्प यांचे प्रचार व्यवस्थापन सांभा‍ळणाऱ्या यंत्रणेने इराणकडून होणाऱ्या धोक्याची जाणीव करून दिली होती का? हे उघड करण्यास नकार दिला. इराणचे लष्करी कमांडर कासिम सुलेमानी यांना जानेवारी २०२० मध्ये ठार मारण्याचा आदेश दिल्याबद्दल इराण डोनाल्ड ट्रम्प यांचा बदला घेईल, अशी भीती अमेरिकन अधिकाऱ्यांना गेली अनेक वर्षे वाटत आहे.

Donald Trump Attack
Donald Trump | केनेडी ते शिंजो आबे...! जगातील मोठ्या नेत्यांवर झाला होता प्राणघातक हल्ला

सिक्रेट सर्व्हिसच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

सिक्रेट सर्व्हिसने ट्रम्प यांना खुल्या जागेत प्रचार सभा घेण्यावरुन अनेकवेळा सतर्क केले होते, असे सीएनएनने वृत्तात म्हटले आहे. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेतील त्रुटींबद्दल सिक्रेट सर्व्हिसवर टीका करण्यात आली आहे.

बायडेन यांच्याकडून चौकशीचे आदेश

अमेरिकेत हिंसाचाराला जागा नाही असे सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी बंदूकधारी हल्लेखोर ट्रम्प यांची हत्या करण्याच्या उद्देशाने इतक्या जवळ कसा येऊ शकतो? याचा स्वतंत्र आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत.

Donald Trump Attack
Donald Trump Rally Firing : ‘गोळी माझ्या कानाला चाटून गेली..’, ट्रम्प यांनी सांगितला हल्ल्याचा घटनाक्रम

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news