Donald Trump | डोनाल्ड ट्रम्प यांना दीर्घायुष्य लाभो! हिंदू सेनेनं केलं होम- हवन

ट्रम्प यांच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त
 Hindu Sena Donald Trump
नवी दिल्ली येथे हिंदू सेनेकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्या दीर्घायुष्यासाठी होम- हवन करण्यात आले. ANI

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन नेते डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यावर गेल्या रविवारी ( दि.१५) पेनसिल्व्हेनिया राज्यात गोळीबार झाला होता. ट्रम्प पेनसिल्व्हेनियामध्ये निवडणूक सभेत भाषण करत असताना २० वर्षीय तरुण थॉमस मॅथ्यू क्रूक्सने त्‍यांच्‍यावर ८ गोळ्या झाडल्या. ट्रम्‍प या प्राणघातक हल्‍ल्‍यातून थोडक्‍यात बचावले. पण त्‍यांच्‍या उजव्या कानाला गोळी चाटून गेली. त्यामुळे त्यांच्या कानातून रक्तस्त्राव झाला. दरम्यान, या घटनेनंतर ट्रम्प यांच्याप्रती जगभरातून सहानभुती व्यक्त होत आहे. नवी दिल्ली येथे हिंदू सेनेकडून (Hindu Sena) एकता आणि पाठिंबा देण्याच्या भावनेने डोनाल्ड ट्रम्प यांच्या दीर्घायुष्यासाठी होम- हवन करण्यात आले.

 Hindu Sena Donald Trump
Baba Vanga-Donald Trump | 'ट्रम्प यांच्यावर हल्ला ! बाबा वेंगांचे भाकीत ठरले खरे

महामृत्युंजय जप हवन यज्ञ

दिल्लीतील दिलशाद गार्डनमधील माँ बगलामुखी शांती पीठ येथे होम-हवन विधी करण्यात आला. हिंदू सेनेने एक भव्य महामृत्युंजय जप हवन यज्ञ केला. ज्यामध्ये पवित्र महामृत्युंजय मंत्राचे १.२५ लाख जप होते. कोणत्याही येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात आणि डोनाल्ड ट्रम्प यांना दीर्घायुष्य लाभावे हा या विधीचा उद्देश होता.

ट्रम्प यांच्या सुरक्षेबद्दल हिंदू सेनेच्या प्रवक्त्याने गंभीर चिंता व्यक्त केली. ट्रम्प यांच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून दैवी हस्तक्षेपाची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

नेमकं काय घडलं होतं?

ट्रम्प पेनसिल्व्हेनियाच्या बटलरमध्ये एका सभेला संबोधित करत होते. याचदरम्यान अचानक त्यांच्यावर गोळीबार झाला. हल्लेखोराने ट्रम्प यांच्या दिशेने अनेक राऊंड गोळीबार केला. त्यातील एक गोळी ट्रम्प यांच्या उजव्या कानाला चाटून गेली. अचानक झालेल्या या हल्ल्याला सुरक्षा रक्षकांनी चोख प्रत्युत्तर दिले. त्यांनी ट्रम्प यांना वाचवले आणि २० वर्षीय हल्लेखोराला ठार केले.

 Hindu Sena Donald Trump
Donald Trump Rally Firing : ‘गोळी माझ्या कानाला चाटून गेली..’, ट्रम्प यांनी सांगितला हल्ल्याचा घटनाक्रम

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news