Donald Trump Rally Firing : ‘गोळी माझ्या कानाला चाटून गेली..’, ट्रम्प यांनी सांगितला हल्ल्याचा घटनाक्रम

गोळीबारानंतर ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया
Donald Trump Firing
गोळीबारानंतर ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया file photo

पुढारी ऑनलाईन डेस्क : Donald Trump Rally Shooting : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि आगामी निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर शनिवारी एका रॅलीदरम्यान हल्ला करण्यात आला. हल्लेखोराने ट्रम्प यांच्यावर खूप उंचावरून गोळीबार केला. समोर आलेल्या घटनेच्या व्हिडिओमध्ये ट्रम्प यांच्या कानातून रक्त येत असल्याचे दिसत आहे. या घटनेनंतर ट्रम्प सुरक्षित असून त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक निवेदन जारी करून गोळीबाराची माहिती दिली.

Donald Trump Firing
Donald Trump Shooting : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार

गोळीबारानंतर ट्रम्प काय म्हणाले?

पेनसिल्व्हेनियातील रॅलीदरम्यान ट्रम्प यांना लक्ष्य करण्यात आले. या घटनेनंतर ट्रम्प यांनी एक निवेदन जारी केले की, 'मी युनायटेड स्टेट्स सीक्रेट सर्व्हिस आणि सर्व कायदा अंमलबजावणी संस्थांचे आभार मानू इच्छितो ज्यांनी पेनसिल्व्हेनियातील बटलर येथे झालेल्या गोळीबारावर तातडीने कारवाई केली. रॅलीत मारल्या गेलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाप्रती आणि जखमी झालेल्या दुसऱ्या व्यक्तीच्या कुटुंबाप्रती मी शोक व्यक्त करू इच्छितो. आपल्या देशात असे कृत्य घडू शकते, यावर विश्वास बसत नाही. सध्या मारल्या गेलेल्या हल्लेखोराबद्दल काहीही माहिती नाही. माझ्या उजव्या कानाच्या वरच्या भागाला गोळी लागली. मला लगेच लक्षात आले की काहीतरी गडबड आहे कारण मी बंदुकीच्या गोळीचा आवाज ऐकला आणि लगेच लक्षात आले की गोळी त्वचेला लागली आहे. माझ्या लक्षात आले की कानातून खूप रक्तस्त्राव होत आहे. देवा अमेरिकेला वाचव,' असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. (Donald Trump Rally Shooting)

Donald Trump Firing
Donald Trump Rally Shooting : पीएम मोदींकडून ट्रम्प यांच्यावरील गोळीबाराचा निषेध , म्हणाले; ‘मित्रावर झालेल्या हल्ल्याचा चिंता’

हल्लेखोरांनी अनेक गोळ्या झाडल्या

अमेरिकन मीडिया रिपोर्ट्सनुसार, डोनाल्ड ट्रम्प पेनसिल्व्हेनियाच्या बटलरमध्ये एका निवडणूक रॅलीला संबोधित करत होते. त्यांचे भाषण सुरू असताना अचानक त्यांच्यावर गोळीबार झाला. हल्लेखोरांनी ट्रम्प यांच्या दिशेने एकामागून एक अनेक झाडल्या. त्यातील एक गोळी ट्रम्प यांच्या उजव्या कानाला चाटून गेली. अचानक झालेल्या या हल्ल्याला सुरक्षा रक्षकांनी चोख प्रत्युत्तर दिले. त्यांनी चपळाईने ट्रम्प यांना वाचवले तसेच 20 वर्षीय हल्लेखोराला ठार केले. ट्रम्प यांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. हल्लेखोर हा पेनसिल्व्हेनियाचा रहिवाशी असल्याचे समोर आले आहे. दुर्दैवाने या हल्ल्यात एका नागरिकाला जीव गमवावा लागला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news