US Israel Iran War: होर्मुझ सामुद्रधुनीजवळ अमेरिकेचा भीषण हल्ला; इराणच्या तळांवर २,२०० किलोचे 'बंकर बस्टर' बॉम्ब टाकले

Israel-Iran war updates: इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धाने आता अत्यंत भीषण वळण घेतले आहे.
US Israel Iran War
US Israel Iran Warfile photo
Published on
Updated on

US Iran War 2026

तेहरान: इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धाने आता अत्यंत भीषण वळण घेतले आहे. अमेरिकेने इराणच्या दक्षिण किनारपट्टीवरील 'होर्मुझची सामुद्रधुनी' परिसरातील क्षेपणास्त्र तळांना लक्ष्य करत मोठा हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यात अमेरिकेने २,२०० किलो वजनाच्या अत्यंत शक्तिशाली 'बंकर बस्टर' बॉम्बचा वर्षाव केला आहे.

US Israel Iran War
Iran-US Israel war : ट्रम्प यांच्यासमोर वाढते आव्हान, अमेरिकेला मोठा आर्थिक फटका

यूएस सेंट्रल कमांडने बुधवारी पहाटे दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकन सैन्याने इराणच्या किनारपट्टीवरील बळकट क्षेपणास्त्र तळांवर अनेक 'डीप पेनिट्रेटर' बॉम्ब डागले. इराणची ही जहाजाविरोधी क्रूझ क्षेपणास्त्रे आंतरराष्ट्रीय मालवाहू जहाजांसाठी मोठा धोका निर्माण करत होती, असा दावा अमेरिकेने केला आहे.

'नाटो' देशांच्या भूमिकेवर ट्रम्प यांची टीका

या हल्ल्याच्या काही तास आधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'नाटो' मित्रदेशांवर आपली नाराजी व्यक्त केली होती. होर्मुझच्या सामुद्रधुनीत व्यापारी जहाजांच्या संरक्षणासाठी लष्करी मदत देण्याचे आवाहन ट्रम्प यांनी केले होते, जे बहुतेक मित्रदेशांनी फेटाळून लावले.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी स्पष्ट केले की, जोपर्यंत परिस्थिती निवळत नाही, तोपर्यंत फ्रान्स आपले नौदल तिथे पाठवणार नाही. यावर ट्रम्प यांनी 'नाटो'वर टीका करताना म्हटले, "नाटोची ही मोठी चूक आहे. आम्हाला कोणाच्याही मदतीची गरज नाही, आम्ही एकटे लढण्यास सक्षम आहोत."

जागतिक इंधन पुरवठ्यावर संकट

मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या या युद्धामुळे होर्मुझची सामुद्रधुनी व्यावहारिकदृष्ट्या बंद झाली आहे. जगातील सुमारे २० टक्के कच्च्या तेलाची वाहतूक याच मार्गावरून होते.

US Israel Iran War
US-Israel Attack Iran: इराणसोबतचे युद्ध किती दिवस सुरू राहणार? डोनाल्ड ट्रम्प यांचे 'महायुद्धा'वर मोठे विधान

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news