Trump Iran warning | 'हॉर्मुझ' खुली होत नाही, तोपर्यंत हल्ले सुरूच राहणार : ट्रम्प यांचा इशारा

Trump Iran warning | इराणच्या नवीन नेतृत्वाने युद्धविरामासाठी संपर्क साधल्‍याचाही केला दावा
Trump Iran warning
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प.
Published on
Updated on

Trump Iran warning

वॉशिंग्टन : "जोपर्यंत हॉर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) जागतिक जहाजांच्या वाहतुकीसाठी पुन्हा उघडली जात नाही आणि ती "मुक्त आणि सुरक्षित" राहत नाही, तोपर्यंत अमेरिका युद्धविरामाचा विचार करणार नाही, असे स्पष्ट संकेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत. महत्त्वाच्या तेल व्यापार मार्गावरील सागरी प्रवेशाशी त्यांनी युद्धविरामाची अट जोडली आहे.

तोपर्यंत अमेरिका कोणताही विचार करणार नाही

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, इराणच्या नवीन नेतृत्वाने युद्धविरामासाठी संपर्क साधला आहे. मात्र, जोपर्यंत धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जागतिक जहाजांची वाहतूक पूर्ववत होत नाही, तोपर्यंत अमेरिका यावर कोणताही विचार करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Trump Iran warning
PM Modi-Trump Talks | पंतप्रधान मोदींची राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी चर्चा; 'होर्मुज'बाबत व्यक्त केली चिंता
Pudhari

...तेव्हाच आम्ही विचार करू

'ट्रुथ सोशल'वर (Truth Social) दिलेल्या निवेदनात ट्रम्प यांनी इराणच्या कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव घेतले नाही, परंतु संबंधित व्यक्तीचे वर्णन पूर्वीच्‍या नेतृत्त्‍वापेक्षा खूपच कमी कट्टर आणि अधिक बुद्धिमान, असे केले आहे. मात्र, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी हे स्पष्ट केले की, "जेव्हा हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली, मुक्त आणि स्पष्ट असेल, तेव्हाच आम्ही विचार करू."तोपर्यंत लष्करी कारवाया सुरूच राहतील, असा पुनरुच्चार ट्रम्प यांनी केला. "तोपर्यंत आम्ही इराणचा नायनाट करत राहू, किंवा लोक म्हणतात त्याप्रमाणे त्यांना पुन्हा पाषाण युगात धाडू!!!" असे त्यांनी म्हटले आहे.

Trump Iran warning
Donald Trump Iran attack | 'आम्हाला पेट्रोल-डिझेलची गरज नाही' : ट्रम्प यांचे युद्धाच्या १८ व्या दिवशी मोठे विधान

'हॉर्मुझची सामुद्रधुनी' बनला युद्धाचे मुख्य केंद्र

हॉर्मुझची सामुद्रधुनी हा एक अरुंद जलमार्ग आहे, जिथून जगातील तेलाचा मोठा पुरवठा होतो. अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यांनंतर इराणने या मार्गावरील वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केल्यामुळे हा भाग सध्या युद्धाचे मुख्य केंद्र बनला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news