

US tariffs on India New Bill: अमेरिका भारत आणि चीनसह अनेक देशांवर पुढच्या आठवड्यात अमेरिका अतिरिक्त टॅरिफ लावण्याची शक्यता आहे. यामुळे काही देशांवर लादलेलं टॅरिफ हे ५०० टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. युएस सिनेटर लिंड्से ग्रॅहम यांनी आज हा दावा केला आहे. त्यांनी रशियावर निर्बंध लादल्यानंतरही रशियाकडून कच्च तेल खरेदी करणे सुरूच ठेवलेल्या भारत, चीन, ब्राझील अन् इतर देशांना शिक्षा देणाऱ्या विधेयकाला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे हिरवा कंदील दाखवण्याची शक्यता असल्याचं सांगितलं.
सिनेटर लिंड्से म्हणाले, 'डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियावरील निर्बंधे दुप्पट करण्याच्या विधेयकाला संमत्ती दिली आहे. बुधवारी याबाबत सकारात्मक बैठक झाली. आता या विधेयकावर पुढच्या आठवड्यात मतदान होणार आहे. या बीलचं टायमिंग उत्तम असल्याचं देखील लिंड्से ग्रॅहम यांनी सांगितलं. हे विधेयक ग्रॅहम आणि सिनेटर रिचर्ड ब्लुमेंथल यांनी स्पोन्सर केलं आहे.
ग्रॅहम यांनी ट्विट केलं की, 'डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत झालेली बैठक अत्यंत सकारात्मक होती. रशियावरील निर्बंधे दुप्पट करणाऱ्या विधेयकाला त्यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. हे विधेयक तयार करण्यासाठी मी आणि सिनेटर रिचर्ड यांनी अनेक महिन्यांपासून तयारी करत आहोत. हे विधेयक योग्य वेळी आलं आहे. युक्रेन शांती प्रस्थापित व्हावी यासाठी प्रयत्न करत आहे तर रशिया निष्पाप लोकांना मारण्याचं सुरूच ठेवत आहे.'
डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार पीटर नावार्रो यांच्या सुरात सूर मिसळत हे विधेयक डोनाल्ड ट्रम्प यांना जे देश रशियाचे स्वस्त तेल खरेदी करून पुतीन यांच्या वॉर मशीनला खाद्य पुरवत आहेत त्यांना शिक्षा करण्यासाठी योग्य आहे असं म्हटलं.
ग्रॅहम म्हणाले, 'हे विधेयक डोनाल्ड ट्रम्प यांना चीन, भारत आणि ब्राझील सारख्या देशांविरूद्ध कारवाई करण्यास उपयुक्त ठरणार आहे. ते रशियाचे स्वस्त तेल खरेदी करून पुतीन यांच्या युक्रेनविरूद्धच्या रक्तरंजीत युद्धाला एकप्रकारे फंडिंगच करत आहेत. मला पुढच्या आठवड्यात या विधयेकाला चांगले मतदान मिळेल असं वाटतं.
जर विधेयक संमत झालं तर...
सध्याच्या घडीला सिनेट आणि हाऊस ऑफ लीडर्सने या विधेयकावरचे मतदान पुढे ढकलले आहे. जर हे विधेयक सिनेटमध्ये संमत झालं तर रशियाला एक्सपोर्ट होणारे युएसच्या वस्तूंवर देखील बंदी येणार आहे. त्याचबरोबर रशियाच्या उर्जा प्रकल्पात अमेरिकेला गुंतवणूक देखील करता येणार नाहीये.
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून आयात करण्यात येणाऱ्या वस्तूंवर २५ टक्के टॅरिफ लावला होता. त्यानंतर रशियाकडून भारत कच्च तेल स्वस्तात खरेदी करतो म्हणून भारतावर अजून २५ टक्के टॅरिफ लावण्यात आला आहे. त्यामुळे भारतावर सध्या ५० टक्के टॅरिफ आहे.
अमेरिकेने चीनवर देखील १४५ टक्के टॅरिफ लावला आहे. त्यानंतर चीननं देखील अमेरिकेवर १२५ टक्के टॅरिफ लावत जशास तसे उत्तर दिले आहे. मात्र जर नवे विधेयक पास झालं तर चीनवर लादलेलं टॅरिफ ५०० टक्क्यांपर्यंत जाऊ शकतं.