Oil prices fall: ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर कच्च्या तेलाचे दर १०० डॉलर्सच्या खाली; पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?

अमेरिका आणि इराणने दोन आठवड्यांच्या युद्धविरामाची घोषणा केली आहे. या सकारात्मक घडामोडीचा थेट परिणाम जागतिक तेल बाजारावर झाला असून, कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे.
Oil prices fall
Oil prices fallfile photo
Published on
Updated on

Oil prices fall

वॉशिंग्टन: अमेरिका आणि इराणने दोन आठवड्यांच्या युद्धविरामाची घोषणा केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी या निर्णयाची घोषणा केली. या सकारात्मक घडामोडीचा थेट परिणाम जागतिक तेल बाजारावर झाला असून, कच्च्या तेलाच्या किमतीत तब्बल १४ टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. यामुळे कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल १०० डॉलर्सच्या खाली आले आहेत.

इराणसोबतच्या करारानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात 'ब्रेंट क्रूड'चे दर १४.८४ डॉलर्सने (१३.६%) कोसळून ९४.४३ डॉलर्सवर आले आहेत. तर, अमेरिकन 'डब्ल्यूटीआय' क्रूड १६.१३ डॉलर्सच्या (१४.३%) घसरणीसह ९६.८२ डॉलर्सवर पोहोचले आहे. मार्च महिन्यात युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत ५० टक्क्यांहून अधिक वाढ झाली होती, जी इतिहासातील सर्वाधिक मासिक वाढ ठरली होती. मात्र, आता हा तणाव कमी झाल्याने गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे.

Oil prices fall
US-Iran War: अमेरिका-इराणमध्ये युद्धविराम: ट्रम्प दोन आठवडे हल्ले थांबवण्यास तयार, इस्रायलचीही संमती

'हॉर्मुझची सामुद्रधुनी' खुली होणार

या युद्धविरामाची मुख्य अट म्हणजे जागतिक तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या 'हॉर्मुझच्या सामुद्रधुनी'चा मार्ग तात्काळ आणि सुरक्षितपणे खुला करणे ही आहे. जगातील एकूण तेल पुरवठ्यापैकी २० टक्के वाहतूक याच मार्गातून होते. इराणने हा मार्ग बंद केल्यास भीषण हल्ला करण्याची शेवटची इशारा ट्रम्प यांनी दिला होता. मात्र, आता इराणनेही एक पाऊल मागे घेतले आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी म्हटले आहे की, "जर आमच्यावरील हल्ले थांबले, तर आम्हीही हल्ले थांबवू. पुढील दोन आठवडे इराणी सशस्त्र दलांच्या समन्वयाने हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित वाहतूक करणे शक्य होईल."

ट्रम्प यांच्या भूमिकेत बदल

"आज रात्री एक संपूर्ण संस्कृती नष्ट होईल" अशी मंगळवारी धमकी देणाऱ्या राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आज सोशल मीडियावरून या युद्धविरामाची घोषणा केली आहे. इराणने पाठवलेला १० कलमी प्रस्ताव चर्चेसाठी योग्य असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले असून, दीर्घकालीन शांततेसाठी दोन्ही देश आता करारावर चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

जरी सध्या किमती घसरल्या असल्या, तरी तज्ज्ञांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे. 'शांतता करार झाला असला, तरी भविष्यात इराणकडून पुन्हा हॉर्मुझच्या सामुद्रधुनीला धोका निर्माण होऊ शकतो, ही भीती बाजारात कायम राहील. असे तज्ञांचे मत आहे. कायमस्वरूपी तोडगा निघण्यासाठी अजून अनेक तांत्रिक बाबींवर काम करणे बाकी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Oil prices fall
US Iran War: अमेरिका-इराण द्विपक्षीय चर्चा १० एप्रिलपासून पाकिस्तानमध्ये

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news