US Iran War: अमेरिका-इराण द्विपक्षीय चर्चा १० एप्रिलपासून पाकिस्तानमध्ये

अमेरिका आणि इराण यांच्यातील द्विपक्षीय चर्चा शुक्रवारी, १० एप्रिल २०२६ पासून पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे सुरू होणार आहे.
US Iran War
US Iran Warfile photo
Published on
Updated on

US Iran War

इस्लामाबाद: अमेरिका आणि इराण यांच्यातील द्विपक्षीय चर्चा शुक्रवारी, १० एप्रिल २०२६ पासून पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे सुरू होणार आहे. इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने या चर्चेला अधिकृत दुजोरा दिला आहे.

पाकिस्तान बजावणार मध्यस्थाची भूमिका

दोन्ही देशांनी चर्चेसाठी एक 'न्यूट्रल व्हेन्यू' म्हणून इस्लामाबादची निवड केली आहे. या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत पाकिस्तान मध्यस्थाची भूमिका बजावत असून, चर्चेसाठी इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

US Iran War
US-Iran War: अमेरिका-इराणमध्ये युद्धविराम: ट्रम्प दोन आठवडे हल्ले थांबवण्यास तयार, इस्रायलचीही संमती

१५ दिवस होणार चर्चा?

प्राथमिक माहितीनुसार, ही चर्चा पुढे दोन आठवडे चालण्याची शक्यता आहे. चर्चेतील प्रगती आणि दोन्ही देशांच्या संमतीनुसार हा कालावधी वाढवला जाण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. इराणने अमेरिकेसमोर एक १० कलमी प्रस्ताव ठेवला असून त्यावर या बैठकीत सविस्तर चर्चा होणार आहे.

इराककडून अमेरिका-इराण युद्धविरामाचे स्वागत

अमेरिका आणि इराण दरम्यान जाहीर झालेल्या दोन आठवड्यांच्या युद्धविरामाचे इराकने स्वागत केले आहे. इराकच्या परराष्ट्र मंत्रालयाने अधिकृत निवेदन प्रसिद्ध करून या निर्णयामुळे मध्यपूर्वेतील तणाव कमी होईल आणि संपूर्ण प्रदेशात सुरक्षा व स्थिरता प्रस्थापित होईल, अशी आशा व्यक्त केली आहे.

इराकने स्पष्ट केले की, संकट निवारण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या प्रयत्नांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. युद्धाऐवजी संवादाला प्राधान्य दिले पाहिजे. दोन्ही बाजूंनी या युद्धविरामाचे पूर्णपणे पालन करावे आणि कोणतीही प्रक्षोभक कारवाई टाळावी, असे आवाहन इराकने केले आहे.

US Iran War
India energy security | भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांशी साधला ३ वेळा संवाद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news