trump iran ultimatum |'नरक कोसळेल...' : ट्रम्प यांचा पुन्‍हा एकदा इराणला ४८ तासांचा अल्टिमेटम

अमेरिकेचे लढाऊ विमान पाडण्यासाठी 'नवीन' संरक्षण प्रणालीचा वापर केल्‍याचा इराणाचा दावा
trump iran ultimatum
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प.File Photo.
Published on
Updated on

donald trump iran ultimatum

तेहरान/वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला एकतर करार करण्यासाठी किंवा होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. तसे न केल्यास इराणवर "नरक कोसळेल", असा गंभीर इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान, इराणने दावा केला आहे की त्यांनी अमेरिकेचे लढाऊ विमान पाडण्यासाठी 'नवीन' संरक्षण प्रणालीचा वापर केला आहे.

Pudhari

४८ तासांनंतर त्यांच्यावर प्रलयासारखे संकट कोसळेल

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्‍लॅटफॉर्म ट्रूथवर केलेले पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे की, मी इराणला 'करार करण्यासाठी' किंवा 'हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी' दहा दिवसांची मुदत दिली होती? आता वेळ संपत आली आहे. ४८ तासांनंतर त्यांच्यावर प्रलयासारखे संकट कोसळेल.

trump iran ultimatum
Fact Check | इराणचा अमेरिकेसाठी 'हवेचा' सापळा? हवेने भरलेल्या फुग्यांची शस्त्रास्त्रे दाखवून अमेरिकन लष्कराची दिशाभूल? सत्‍य काय?

इराणचा अमेरिकन लढाऊ विमान पाडल्याचा दावा

इराणच्या 'खातम अल-अंबिया' संयुक्त लष्करी कमांडने आज स्‍पष्‍ट केले की, शुक्रवारी अमेरिकेच्या एका लढाऊ विमानाला लक्ष्य करण्यासाठी "नवीन" हवाई संरक्षण प्रणालीचा वापर केला. इराणच्या सरकारी माध्यमांनुसार, लष्करी प्रवक्त्याने म्हटले आहे की, देश आपल्या हवाई क्षेत्रावर "निश्चितपणे पूर्ण नियंत्रण" मिळवेल.

trump iran ultimatum
Iran Us War| अमेरिका-इराण युद्धात पाकिस्तानची एंट्री; ट्रम्पवर स्तुतीसुमने उधळणाऱ्या मुनीर यांच्याकडे मोठी जबाबदारी

युद्धबंदीसाठी पाकिस्तानचे प्रयत्न सुरू

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, युद्धबंदी घडवून आणण्यासाठी इस्लामाबादचे प्रयत्न "योग्य मार्गावर" आहेत. मध्यस्थीच्या प्रयत्नांमध्ये कोंडी निर्माण झाल्याच्या वृत्तानंतर प्रवक्ते ताहिर अंद्राबी यांनी एपा (AP) शी बोलताना ही माहिती दिली.पाकिस्तानने गेल्या आठवड्यात तुर्की, इजिप्त आणि सौदी अरेबियाच्या वरिष्ठ राजदूतांचे यजमानपद भूषवले होते. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी सांगितले की, इराणने इस्लामाबादला जाण्यास कधीही नकार दिला नाही, परंतु सरकार या संघर्षाचा "निर्णायक आणि कायमस्वरूपी" अंत शोधत आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी या विधानाचे स्वागत केले आहे.

trump iran ultimatum
Abbas Araghchi Israel Hit List: भारताला 'सेफ पॅसेज' देणारे परराष्ट्रमंत्रीही होते इस्त्रायलच्या रडारवर... पाकमुळं घेतली माघार

इराणकडून इस्रायलवर पुन्हा क्षेपणास्त्र हल्ला

इस्रायली सैन्याने इशारा दिला आहे की, इराणकडून पुन्हा एकदा क्षेपणास्त्रांची लाट इस्रायलच्या दिशेने येत आहे. गेल्या दोन तासांतील हा दुसरा मोठा हल्ला असल्याचे सांगण्यात येत आहे.

trump iran ultimatum
US Iran conflict | अमेरिकेचा मोठा प्लॅन? इराणमध्ये ग्राउंड ऑपरेशनची तयारी, 'होर्मुझ'सह खार्ग बेटावरही डोळा

शैक्षणिक संस्थांना लक्ष्य केल्याचा इराणचा आरोप

इराणचे विज्ञान मंत्री हुसेन सिमाई सर्राफ यांनी दावा केला आहे की, अमेरिका आणि इस्रायलसोबतच्या संघर्षात देशातील ३० हून अधिक विद्यापीठांवर थेट हल्ले झाले आहेत. त्यांनी म्हटले की, "गैर-लष्करी ठिकाणे आणि शिक्षण व संशोधनासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आले आहे, ज्यामुळे लाखो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले आहेत."तेहरानमधील प्रतिष्ठित 'शहीद बेहेश्टी विद्यापीठा'चेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. इराणने या हल्ल्यांना देशाचा वैज्ञानिक आणि सांस्कृतिक पाया कमकुवत करण्याचा प्रयत्न म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news