Trump Iran ultimatum | ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या 'अल्टिमेटम'नंतर इराणचे 'हॉर्मुझ'बाबत मोठे विधान; "केवळ 'शत्रू राष्ट्रे'.."

Trump Iran ultimatum | इराणमधील वीज प्रकल्‍पांना टार्गेट करण्‍याची ट्रम्‍प यांनी दिली होती धमकी
Trump Iran ultimatum
प्रातिनिधिक छायाचित्र. File Photo.
Published on
Updated on

Trump Iran ultimatum

तेहरान: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील ४८ तासांत हॉर्मुझची सामुद्रधुनी 'पूर्णपणे खुली' न केल्यास इराणच्या वीज प्रकल्पांना लक्ष्य करण्याची धमकी दिली होती. या इशाऱ्यानंतर काही तासांतच इराणने आपली भूमिका मवाळ केली आहे. "शत्रू" देशांशी (प्रामुख्याने अमेरिका आणि इस्रायल) संबंधित जहाजे वगळता इतर सर्व जहाजांसाठी हा जलमार्ग खुला राहील, असे इराणच्या वरिष्ठ प्रतिनिधीने स्पष्ट केले आहे.

'ती' जहाजे हॉर्मुझच्‍या सामुद्रधुनीतून प्रवास करू शकतात...

आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेतील (IMO) इराणचे प्रतिनिधी अली मौसावी यांनी रविवारी सांगितले की, ज्या जहाजांचा इराणच्या शत्रूंशी संबंध नाही, ती जहाजे तेहरानसोबत सुरक्षा आणि सुरक्षिततेबाबत समन्वय साधून हॉर्मुझच्‍या सामुद्रधुनीतून प्रवास करू शकतात. इराण या आखाती क्षेत्रात सागरी सुरक्षा सुधारण्यासाठी आणि खलाशांच्या संरक्षणासाठी संयुक्त राष्ट्रांच्या संस्थेसोबत सहकार्य करण्यास तयार आहे. मात्र, सध्या हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत निर्माण झालेल्या तणावासाठी इस्रायल आणि अमेरिकेचे इराणवरील हल्लेच कारणीभूत असल्याचा दावा त्यांनी केला.

Trump Iran ultimatum
2026 strait of hormuz crisis: तेल मुत्सद्देगिरीत भारताचे यश

मुत्सद्देगिरीला इराणचे प्राधान्य

"मुत्सद्देगिरी हेच इराणचे प्राधान्य आहे. मात्र, आक्रमकता पूर्णपणे थांबवणे तसेच परस्पर विश्वास आणि खात्री असणे अधिक महत्त्वाचे आहे," असे मौसावी यांनी नमूद केले.

Trump Iran ultimatum
Donald Trump Iran warning |"इस्रायलचे हल्ले आता थांबणार, पण..."; कतारवरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा इराणला इशारा

जागतिक ऊर्जेवर संकटाची भीती

अमेरिका आणि इस्‍त्रायलने २८ फेब्रुवारी रोजी इराणवर संयुक्‍त हल्‍ला केला. तेव्‍हापासून इराणने हा महत्त्वाचा हॉर्मुझची सामुद्रधुनीमधून ऊर्जा पुरवठा मार्ग बंद केला होता. जगातील एकूण तेल आणि द्रव नैसर्गिक वायूच्या (LNG) पुरवठ्यापैकी पाचवा हिस्सा याच मार्गावरून जातो. "अमेरिका, इस्रायल आणि त्यांच्या भागीदारांपर्यंत तेलाचा एक थेंबही पोहोचू देणार नाही," अशी भूमिका इराणने घेतली होती. अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे या अरुंद सामुद्रधुनीतून प्रवास करण्यास बहुतांश जहाज व्‍यवस्‍थापन कंपन्‍यांन्‍या दहशतीत आहेत. यामुळे जागतिक स्तरावर ऊर्जा संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अमेरिकेने या मार्गावरून जाणाऱ्या जहाजांना संरक्षण देण्यासाठी नौदल युती करण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु बहुतांश नाटो (NATO) मित्र राष्ट्रांनी इराणविरुद्धच्या लष्करी कारवाईत सहभागी होण्यास नकार दिला आहे.

Trump Iran ultimatum
Strait of Hormuz Tensions | 'होर्मुझ'मध्ये युद्धनौका तैनातीबाबत अमेरिकेशी कोणतीही चर्चा नाही; भारताची स्‍पष्‍टोक्‍ती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news