Taliban Bans Women Names : तालिबानचा नवा फतवा! कागदपत्रांवर महिलांच्या नावांना बंदी; 'गाय', 'शेळी' लिहिण्याचे आदेश

Taliban Bans Women Names : बल्ख प्रांतात वैद्यकीय नोंदी आणि डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनमध्‍ये महिलांची नावे वापरण्यावर बंदी
Taliban Bans Women Names
प्रातिनिधिक छायाचित्र. Flie Photo.
Published on: 
Updated on: 

Taliban Bans Women Names : अफगाणिस्‍तानमधील तालिबानी सरकारकडून महिलांविरोधातील दपडशाही पुन्‍हा एकदा समोर आली आहे. देशातील उत्तरेकडील बल्ख प्रांतात, तालिबानच्या अधिकाऱ्यांनी अधिकृत कागदपत्रांमध्ये वैद्यकीय नोंदी आणि डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनमध्‍ये महिलांची नावे वापरण्यावर बंदी घातली असल्याचे वृत्त समोर आले आहे.

देशाच्या इतर भागांतही लागू केला जाऊ शकतो आदेश

स्पॅनिश वृत्तपत्र 'एल पाइस' (El País) ने अफगाण माध्यम 'झान टाइम्स' (Zan Times) आणि 'द गार्डियन' (The Guardian) कडील माहितीच्या आधारे या निर्देशाबाबत वृत्त दिले आहे. हा आदेश देशाच्या इतर भागांतही लागू केला जाऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Taliban Bans Women Names
Taliban Marriage Law: अफगाणिस्तानमध्ये बालविवाहाला मान्यता; तालिबानचा नवा कायदा काय आहे? जगभरातून होतेय टीका

'काही महिलांना शेळी किंवा गाय म्हणून संबोधले जात आहे'

रिपोर्टनुसार, बल्खमधील रुग्णालयीन कर्मचारी तसेच इतर सरकारी कर्मचाऱ्यांना महिलांची नावे न वापरण्यास सांगण्यात आले आहे. जर्मनीत वास्तव्यास असलेल्या अफगाण महिला हक्क कार्यकर्त्या लाला उस्मानी यांनी 'एल पाइस'शी बोलताना सांगितले की, महिला, डॉक्टर आणि नागरी हक्क कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार काही महिलांना 'शेळी' किंवा 'गाय' यांसारख्या अपमानास्पद शब्दांनी संबोधले जात आहे. लोकांना माणूस न समजण्याची ही एक सुनियोजित प्रक्रिया आहे. अफगाण कार्यकर्त्याने 'एल पाइस'कडे या आदेशाला दुजोरा दिला.

Taliban Bans Women Names
Pakistan airstrikes Taliban | पाकिस्तानचे हवाई हल्ले; 6 तालिबानी ठार

२०२१ मध्‍ये तालिबान सत्ते आल्‍यापासून महिलांवर विविध निर्बंध

महिला हक्कांसाठी कार्यरत असलेल्या 'फेमेना' (Femena) या संस्थेच्या अफगाणिस्तान कार्यक्रमाच्या प्रमुख झुबैदा अकबर यांनी इशारा दिला आहे की, ही बंदी पुढे जाऊन संपूर्ण देशात लागू होऊ शकते. स्थानिक पातळीवर सुरू केलेल्या अनेक निर्बंधांचा नंतर संपूर्ण अफगाणिस्तानात विस्तार झाल्याच्या घटनांकडे त्यांनी लक्ष वेधले. 'एल पैस'च्या वृत्तानुसार, फेमेनाने महिलांचे हक्क मर्यादित करणाऱ्या १४४ हून अधिक आदेशांची नोंद केली आहे. २०२१ मध्ये तालिबान सत्तेत आल्यापासून महिलांवर विविध निर्बंध लादले जात असून, हा निर्णय त्याचाच एक भाग आहे.

महिलांच्या वैद्यकीय प्रशिक्षणावरही बंदी, आरोग्यसेवेवरही परिणाम

अफगाणिस्‍तानमध्‍ये बारा वर्षांवरील मुलींच्या शिक्षणावर बंदी घालण्यात आली आहे, तर बहुतांश व्यवसायांपासून महिलांना दूर ठेवण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी महिलांना बोलण्यावरही निर्बंध आहेत. याचा परिणाम आरोग्यसेवेवरही झाला आहे. अनेक प्रांतांत पुरुष डॉक्टरांना महिला रुग्णांवर उपचार करण्यास मनाई केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. आरोग्य क्षेत्रात काम करण्याची परवानगी असलेल्या मोजक्या गटांमध्ये महिलांचा समावेश आहे; परंतु डिसेंबर २०२४ मध्ये तालिबानने महिलांच्या वैद्यकीय प्रशिक्षणावरही बंदी घातली.

Taliban Bans Women Names
Taliban India Relations | तालिबान-भारत संबंधांचा नवा अर्थ

दुहेरी संकट उभे राहिल्याचा 'युनिसेफ'चा इशारा

या निर्बंधांमुळे दुहेरी संकट उभे राहिल्याचा इशारा युनिसेफने दिला आहे. प्रशिक्षित महिला आरोग्य कर्मचारी एकतर नोकरी सोडत आहेत किंवा निवृत्त होत आहेत; मात्र त्यांच्या जागी नवीन महिलांना येण्याची परवानगी दिली जात नाही.अफगाण महिलांना अधिकृत कागदपत्रे मिळवण्यात कोणत्या अडचणी येतात, यावर संयुक्त राष्ट्राच्या २०२४ च्या अहवालात प्रकाश टाकण्यात आला आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महिलांना सहसा सोबत पुरुषाची गरज भासते. त्यामुळे कुटुंबाची प्रमुख असलेल्या किंवा सोबत येण्यासाठी कोणताही पुरुष नातेवाईक नसलेल्या महिलांच्या अडचणीत भर पडत असल्‍याचे यामध्‍ये नमूद करण्‍यात आले होते.

'अफगाणिस्तानात महिलांनी काम करणे हा गुन्हा'

आरोग्यसेवा, शिक्षण, मदतकार्य आणि बँकिंग सेवा मिळवण्यासाठी अनेकदा अशी कागदपत्रे लागतात. निर्बंध असूनही काही महिला लपूनछपून आपला व्यवसाय चालवत आहेत आणि गुप्त शाळा सुरू ठेवल्या आहेत. १७ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या 'असोसिएटेड प्रेस'च्या अहवालात काबूलमधीलब्युटी सलूनच्या मालकिणीने म्हटले आहे की, "अफगाणिस्तानात महिलांनी काम करणे हा एक गुन्हा बनला आहे. एका गुप्त शाळेतील सहाय्यक शिक्षकाने सांगितले की, "आम्ही त्या शक्यतेने प्रचंड घाबरलो आहोत." अटकेच्या भीतीही त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.