

Sunita Williams Announce Retire: नासाची अंतराळवीर सुनिता विलियम्सने अखेर आपली २७ वर्षाची कारकीर्द संपुष्टात आणली आहे. त्यांनी निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. सुनिता विलियम्स यांनी डिसेंबर २०२५ मध्येच निवृत्तीचा निर्णय घेतला. नासाने याबाबतची माहिती आज (दि. २१ जानेवारी) दिली.
सुनिता विलियम्स या ६० वर्षाच्या असून त्यांनी तीनवेळी आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये जाण्याची मिशन पूर्ण केली आहेत. त्यांनी अंतराळातील अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
सुनिता विलियम्सच्या निवृत्तीच्या घोषणेवेळी नासाचे प्रशासक जेरेड इसाकमन यांनी सुनिता विलियम्स यांना 'मानवी स्पेसफ्लाईटमधील अग्रेसर व्यक्ती' म्हणून संबोधत त्यांचा गौरव केला. याचबरोबर सुनिता विलियम्स यांनी स्पेस स्टेशनचे केलेले नेतृत्व हे भविष्यात मोहीमा करणारे आणि लो अर्थ ऑरबिटमध्ये व्यावसायिक मिशन करणाऱ्यांना एक दिशादर्शक ठरणार आहे असे देखील वक्तव्य केले. जेरेड म्हणाले, 'एका उत्तम निवृत्तीसाठी अभिनंदन. नासाला आणि देशाला दिलेल्या सेवेसाठी आभारी आहे.'
सुनिता विलियम्स यांनी ६०८ दिवस अंतराळात घालवले होतेएकत्रित सर्वाधिक दिवस अंतराळात घालवण्याऱ्यांच्या . नासाच्या अंतराळवीरांच्या यादीत सुनिता विलियम्स या दुसऱ्या स्थानावर आहेत. त्याचबरोबर त्या अमेरिकेकडून सर्वात जास्तकाळ एकाच स्पेसफ्लाईटमध्ये वेळ घालवणाऱ्यांच्या यादीत सहाव्या स्थानावर आहेत. त्यांनी अंतराळवीर बुच विलमोर यांच्याशी बरोबरी केली आहे. या दोघांनी २८६ दिवस पृथ्वीच्या कक्षेत घालवले आहेत.
सुनिता विलियम्स यांनी नऊ स्पेस वॉक केले असून त्यांनी एकूण ६२ तास आणि ६ मिनिटे स्पेस वॉक केलं आहे. नासाच्या म्हणण्यानुसार एका महिला अंतराळवीराचा हा सर्वात जास्त स्पेस वॉक टाईम आहे. याचबरोबर सुनिता विलियम्स या स्पेसमध्ये मॅरेथॉन पळणाऱ्या पहिल्या व्यक्ती आहेत.
सुनिता विलियम्स यांनी पहिल्यांदा २००६ मध्ये डिस्कव्हरी स्पेस शटलमधून अंतराळात झेप घेतली होती. त्यानंतर त्या अटलांटिसमध्ये उतरल्या. त्यांनी फ्लाईट इंजिनिअर म्हणून १४ आणि १५ एक्सिडिशन्स पूर्ण केली. त्यांनी विक्रमी चौथे स्पेस वॉक केले.
२०१२ मध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये परतल्या. त्यांनी ३२ आणि ३३ वी मोहीम पूर्ण केली. त्यावेळी त्यांनी स्पेस स्टेशन कमांडर म्हणून सेवा बजावली. त्यांनी क्रिटिकल रिपेअर स्पेसवॉक देखील केलं.
नुकतेच त्यांनी जून २०२४ मध्ये एक अंतराळ मिशन केलं. त्यावेळी विलियम्स आणि विलमोअर यांनी बोईंग स्टारलाईनर लाँच केली. ही पहिली क्रू टेस्ट फ्लाईट होती.
हे एक अल्पावधीचं मिशन होतं. मात्र स्पेसक्राफ्टमधील तांत्रिक कारणामुळे ते मिशन जवळपास ९ महिने ताणलं गेलं. अखेर ही जोडी मार्च २०२५ मध्ये पृथ्वीवर परतली. स्पेसेक्स क्रू ९ मिशन लाँच करून त्यांना पृथ्वीवर आणण्यात आलं.
सुनिता विलियम्स या भारतीय वंशाच्या असून त्या ज्यावेळी भारत दौऱ्यावर होत्या त्यावेळी त्यांनी मी घरी परतले असं म्हणत आपला देशाविषयीचा जिव्हाळा व्यक्त केला होता.
नुकतेच दिल्ली भेटीवेळी त्यांनी अंतराळातून पृथ्वीकडे पाहताना मनुष्य किती छोटा आहे याची जाणीव होते असं सांगितलं होतं. सुनिता विलियम्स यांनी त्यांच्या कारकिर्दीकडं पाहताना सांगितलं की त्यांची सर्वात आवडती जागा ही स्पेसच आहे. त्यांनी त्यांच्या या दैदिप्यमान प्रवासाचे क्रेडिट त्यांच्या सहकाऱ्यांना दिलं.
त्या म्हणाल्या की 'माझी नासामधील २७ वर्षाची कारकीर्द ही जबरदस्त होती. आम्ही जो पाया रचला आहेत त्यामुळं पुढचे धाडसी निर्णय थोडे सोपे होतील. मी नासासाठी खूप उत्साही आहे. नासा इतिहास घडवताना पाहण्यासाठी मी उतावळी झाली आहे.'