Sundar Pichai : गुगल CEO सुंदर पिचाईंच्या भाषणादरम्यान विद्यार्थ्यांचा ‘वॉकआउट’! स्टॅनफोर्ड विद्यापीठामध्‍ये नेमकं काय घडलं?

Sundar Pichai Stanford speech : पदवीदान समारंभात काही काळ तणावाचे वातावरण
Sundar Pichai Stanford speech
स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या (Stanford University) पदवीदान समारंभात बोलताना (Google) सीईओ सुंदर पिचाई.
Published on
Updated on

Sundar Pichai Stanford speech : स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या (Stanford University) पदवीदान समारंभात एक अनपेक्षित आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुगलचे (Google) सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांचे मुख्य भाषण सुरू असतानाच, पदवीधर विद्यार्थ्यांच्या एका मोठ्या गटाने कार्यक्रम सोडून बाहेर पडत (वॉकआउट) तीव्र निषेध नोंदवला. या घटनेमुळे संपूर्ण सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

नेमका निषेध कशासाठी?

रिपोर्टनुसार, हा निषेध गुगल कंपनीने सरकारी आणि संरक्षण-संबंधित संस्थांशी केलेल्या कथित करारांविरोधात होता. 'ब्रेकथ्रू न्यूज'ने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टनुसार, 'स्टुडंट्स फॉर जस्टिस इन पॅलेस्टाईन' आणि 'नो टेक फॉर अपार्थाइड' या विद्यार्थी संघटनांनी या आंदोलनाचे आयोजन केले होते. इस्रायली संरक्षण दल (IDF), अमेरिकेचे 'डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी' आणि 'इमिग्रेशन अँड कस्टम्स एनफोर्समेंट' यांच्याशी गुगलने केलेल्या कथित करारांना या विद्यार्थ्यांनी कडाडून विरोध केला. पिचाई व्यासपीठावर बोलण्यासाठी उभे राहताच अनेक विद्यार्थी एकाच वेळी जागेवरून उठले आणि सभागृहाबाहेर पडले.

Sundar Pichai Stanford speech
Swati Deval Video: सारे भारतीय माझे बांधव.. मात्र आता हे बदलू लागलंय; स्वाती देवल यांनी सांगितला अंगावर शहारे आणणारा 'तो' अनुभव

पिचाईंचे संयमित भाषण; एआयवर बोलणे टाळले

अमेरिकेतील इतर विद्यापीठांमध्ये सध्या 'एआय' (AI - कृत्रिम बुद्धिमत्ता) आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील बदलांवरून वाद सुरू आहेत. मात्र, स्टॅनफोर्डचे माजी विद्यार्थी असलेल्या सुंदर पिचाई यांनी आपल्या भाषणात कोणताही तांत्रिक किंवा वादग्रस्त विषय स्पर्श करणे टाळले. त्यांनी नवीन पदवीधरांना केवळ वैयक्तिक आणि सामान्य सल्ला देण्यावर भर दिला.

Sundar Pichai Stanford speech
IPL 2026 Pitches Controversy | "६, ६, ६ बघणं कंटाळवाणं..." : IPL 2026 च्या खेळपट्ट्यांवर १३ कोटींचा स्टार खेळाडू भडकला!

पिचाईंनी दिला आयुष्यात नेहमी आशावादी राहण्याचा संदेश

भाषणादरम्यान हलकी-फुलकी टिप्पणी करताना पिचाई म्हणाले, "मला माहिती आहे की आजचा दिवस तुम्हाला सल्ला देण्यासाठी आहे. पण काय बोलावे याबद्दल मलाही अनेक लोक सल्ला देत आहेत. खरं तर, तो सल्ला एकसारखाच आहे आणि तो म्हणजे – काय बोलू नये." लोकांना वाटले की हे माझ्यासाठी खूप कठीण जाईल. शेवटी, माझ्या आडनावाची शेवटची दोन अक्षरेच ती आहेत (Pich-AI)." यावेळी पिचाई यांनी विद्यार्थ्यांना आयुष्यात नेहमी आशावादी राहण्याचा संदेश दिला. त्यांनी १९९० च्या दशकातील कॅलिफोर्नियामधील आपल्या सुरुवातीच्या संघर्षाची आठवण सांगत, बदलत्या दृष्टिकोनाचे महत्त्व स्पष्ट केले.

Sundar Pichai Stanford speech
Glenn Phillips Angry RCB vs GT: हा मूर्खासारखा प्रश्न आहे... पत्रकार परिषदेत गुजरातचा ग्लेन फिलिप्स एवढा का भडकला?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news