स्पेसएक्स आणि टेस्लाच्या विलीनीकरणाची चाचपणी

एकत्रित कंपनीचे मूल्य ३.५ लाख कोटी डॉलरच्या आसपास जाण्याचा अंदाज
स्पेसएक्स आणि टेस्ला
Elon Musk
Published on: 
Updated on: 

न्यूयॉर्क : अनिल टाकळकर

जगातील सर्वांत श्रीमंत उद्योगपती एलॉन मस्क यांनी आपले व्यापक तंत्रज्ञान साम्राज्य उभारण्यासाठी आपल्या मालकीच्या स्पेसएक्स आणि टेस्ला या दोन कंपन्यांनी विलीनीकरणाच्या शक्यतेचा अभ्यास सुरू केला आहे. हा व्यवहार पूर्ण झाल्यास रॉकेट आणि अवकाश तंत्रज्ञान, इलेक्ट्रिक वाहने आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) या क्षेत्रांतील मस्क यांचे हितसंबंध एकाच महाकाय कंपनीत एकत्र येऊ शकतात. या संयुक्त कंपनीचे बाजारमूल्य सुमारे ३.५ लाख कोटी डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

स्पेसएक्सच्या उत्पन्नासंदर्भातील चर्चेदरम्यान मंगळवारी मस्क यांनी विलीनीकरणाच्या शक्यतेला दुजोरा दिला. स्पेसएक्स आणि टेस्लाच्या संचालक मंडळांनी या व्यवहाराचा विचार करण्यासाठी स्वतंत्र संचालकांच्या विशेष समित्या स्थापन केल्याचे त्यांनी सांगितले. या दोन्ही कंपन्यांचे एकत्रीकरण ही चांगली कल्पना ठरेल, असे मस्क म्हणाले. मात्र, या व्यवहारात त्यांचे स्वतःचे हितसंबंध गुंतलेले असल्यामुळे आणि व्यवहाराच्या अटी ठरविण्यावर त्यांचा प्रभाव पडू शकत असल्यामुळे ते विलीनीकरणासंदर्भातील चर्चेत थेट सहभागी होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

स्पेसएक्स आणि टेस्ला
Meta $25 Billion Fine: ग्राहकांची फसवणूक...; मेटाला तब्बल २५ अब्ज डॉलरचा दंड; नेमकं प्रकरण काय?

एकाच कंपनीत अनेक तंत्रज्ञान क्षेत्रांचे सामर्थ्य या विलीनीकरणाच्या प्रस्तावाला मस्क यांचे समर्थक आणि अनेक गुंतवणूकदार अनुकूल आहेत. त्यांच्या मते, स्पेसएक्स आणि टेस्ला यांच्यात सॉफ्टवेअर विकास, हार्डवेअर उत्पादन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराच्या क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर समन्वय साधता येऊ शकतो. स्पेसएक्सचे कार्यक्षेत्र केवळ रॉकेट आणि अवकाश मोहिमांपुरते मर्यादित नाही. त्यात एआय मॉडेल्स आणि स्टारलिंक या उपग्रहाधारित इंटरनेट सेवांचाही समावेश आहे. दुसरीकडे, टेस्ला इलेक्ट्रिक कार, स्वयंचलित वाहन चालविण्याचे तंत्रज्ञान आणि रोबोट विकसित करते.

स्पेसएक्स आणि टेस्ला
Putin Witkoff St Petersburg meeting -युक्रेन युद्ध समाप्तीसाठी अमेरिकेकडून नवे प्रयत्न

या सर्व व्यवसायांचे एकत्रीकरण झाल्यास उत्पादनापासून ते इंटरनेट संपर्क, संगणकीय क्षमता आणि एआय मॉडेल्सच्या प्रशिक्षणापर्यंत अनेक प्रक्रिया एकाच व्यावसायिक व्यवस्थेखाली आणता येतील.

टीकाकारांना चिंता

मस्क यांच्या व्यावसायिक साम्राज्याचे वाढते केंद्रीकरण काही अमेरिकी खासदार आणि टीकाकारांच्या चिंतेचा विषय बनले आहे. जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तीच्या हातात आधीच प्रचंड आर्थिक आणि तांत्रिक सत्ता केंद्रित झाली असून, विलीनीकरणामुळे ती आणखी वाढू शकते, अशी त्यांची भीती आहे.

विलीनीकरणाच्या चर्चेचा परिणाम शेअर बाजारातही दिसून आला. बुधवारी अमेरिकी बाजारात व्यवहार सुरू होण्यापूर्वी स्पेसएक्सच्या समभागात आठ टक्क्यांची वाढ झाली, तर टेस्लाच्या समभागात सुमारे एक टक्क्याची वाढ नोंदविण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news