Meta $25 Billion Fine: ग्राहकांची फसवणूक...; मेटाला तब्बल २५ अब्ज डॉलरचा दंड; नेमकं प्रकरण काय?

फेसबुक वापरकर्त्यांच्या वैयक्तिक माहितीच्या गोपनीयतेबाबत ग्राहकांची दिशाभूल केल्याप्रकरणी अमेरिकेतील न्यू मेक्सिको न्यायालयाने मेटाला २५ अब्ज डॉलरचा दंड ठोठावला आहे.
Meta
MetaFile Photo
Published on: 
Updated on: 

Meta $25 Billion Fine

न्यू मेक्सिको : फेसबुकवरील वैयक्तिक डेटाच्या गोपनीयतेबाबत ग्राहकांची दिशाभूल केल्याप्रकरणी अमेरिकेतील न्यू मेक्सिको न्यायालयाने मेटाला २५ अब्ज डॉलरचा दंड ठोठावला आहे. 'कॅम्ब्रिज ॲनालिटिका' प्रकरणाशी संबंधित असलेल्या या खटल्यात न्यायालयाने हा मोठा निर्णय दिला. अमेरिकेच्या इतिहासातील एखाद्या कंपनीला ठोठावण्यात आलेल्या सर्वांत मोठ्या आर्थिक दंडांपैकी हा एक असल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.

न्यू मेक्सिकोच्या जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश फ्रान्सिस मॅथ्यू यांनी गुरुवारी हा निकाल दिला. 'मेटा'ने राज्याच्या ग्राहक संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात न्यायालयाने मेटाला तब्बल ४.३ कोटी उल्लंघनांसाठी दोषी ठरवले होते. या प्रकरणी सुरुवातीला २१९.५ अब्ज डॉलरचा दंड आकारण्यात आला होता, परंतु अंतिम आदेशात ही रक्कम २५ अब्ज डॉलर करण्यात आली. तरीही, हे उल्लंघन अत्यंत गंभीर असल्याने कायद्यातील तरतुदींनुसार प्रति-उल्लंघन कमाल ५,००० डॉलर दंडाची तरतूद लागू करण्यात आली आहे. याशिवाय, दंडाची संपूर्ण रक्कम भरेपर्यंत कंपनीला वर्षाला १५ टक्के दराने व्याज द्यावे लागणार असल्याचेही न्यायाधीशांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे.

Meta
Central govt. Strict Directions to Meta : सोशल मीडियात एकांगी मतांचा प्रसार रोखा : केंद्र सरकारचे ‘मेटा’ला कडक निर्देश

केंब्रिज अॅनालिटिका प्रकरणातून खटल्याला सुरुवात

न्यू मेक्सिकोचे अॅटर्नी जनरल राउल टोरेझ यांनी २०२१ मध्ये मेटाविरोधात हा खटला दाखल केला होता. ब्रिटनमधील आता बंद पडलेल्या केंब्रिज अॅनालिटिका या राजकीय सल्लागार कंपनीने तृतीय पक्षाच्या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून फेसबुकच्या तब्बल ८ कोटी ७० लाख वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती मिळविल्याचे उघड झाल्यानंतर ही कायदेशीर कारवाई करण्यात आली होती.

या माहितीचा वापर मतदारांची राजकीय कल ओळखणे आणि त्यांना लक्ष्य करून प्रचार करण्यासाठी करण्यात आला होता. केंब्रिज अॅनालिटिकाच्या ग्राहकांमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या २०१६ मधील अध्यक्षीय निवडणूक प्रचार मोहिमेचाही समावेश होता.

'मेटा'चा न्यायालयात आव्हानाचा इशारा

न्यायालयाच्या या निर्णयावर मेगाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मेटाचे मुख्य कायदेशीर अधिकारी सी. जे. महोनी यांनी सांगितले की, "आम्ही या निर्णयाविरुद्ध न्यायालयात अपील करणार असून, आम्हाला विजयाची पूर्ण खात्री आहे." तसेच, "अशा प्रकारच्या निर्णयामुळे न्यू मेक्सिको राज्यात व्यवसाय करणे जवळजवळ अशक्य होईल. ही केवळ ऑनलाईन संभाषणावर नवीन नियम लादण्यासाठी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कर आकारण्यासाठी केलेली कारवाई आहे," असा दावाही महोनी यांनी केला.

Meta
Meta VR Glasses: मेटाने लाँच केला जादूई चष्मा; घरबसल्या IMAX थिएटरची मजा, व्हिडिओ कॉलमध्ये समोर दिसेल जिवंत माणूस!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news