Sailors Jump USS Abraham Lincoln: अब्राहम लिंकन जहाजावरून वरून सैनिक उड्या मारण्याच्या प्रयत्नात, कुटुंबीयांचेही गंभीर आरोप?

Sailors Jump USS Abraham Lincoln
Sailors Jump USS Abraham Lincolnpudhari
Published on
Updated on

Sailors Jump USS Abraham Lincoln: अमेरिका आणि इराण यांच्यातील लष्करी संघर्ष गेल्या काही दिवसांपासून संपण्याचं नाव घेत नाहीये. एका बाजूला शांतता करार झाला अशी घोषणा होते तर दुसरीकडे होर्मुझवरील नियंत्रणावरून पुन्हा संघर्षाची ठिणगी पडते. यामुळे अमेरिकेच्या लष्करी जहाजांवर तैनात असलेल्या सैनिकांच्या मानसिकतेवर याचा परिणाम होत आहे.

Sailors Jump USS Abraham Lincoln
US-Iran War Oil Price: अमेरिका - इराणचे एकमेकांवर रोज हल्ले तरी कच्च्या तेलाच्या किंमती कशा घसरल्या?

नाविक जहाजावरून उड्या मारण्याच्या प्रयत्नात

नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार युएए अब्राहम लिंकनवरील एका नाविकाने जहाजावरून उडी मारण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त आले आहे. त्याच्यावर वाढता मानसिक दबाव यामुळं त्याने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. तसेच मध्य पूर्व आशियातील त्याची सतत वाढती तैनाती हा काळजीचा विषय झाली आहे. लष्करी जवानांचे कुटुंबीय आण युएस सिनेटर यांनी एअरक्राफ्ट कॅरिअरवरील परिस्थिती आता हाताबाहेर जाण्याच्या स्थितीत असल्याचा इशारा देत आहेत.

Sailors Jump USS Abraham Lincoln
Iran vs US War : कठोर लष्करी कारवाई करू, ट्रम्प यांचा इराण, हुतींना इशारा; आखातात तणाव शिगेला

२५० दिवस समुद्रातच

जवळपास ५००० नाविक आणि मरीन कमांडो हे युएएस अब्राहम लिंकन कॅरिअरवर आहेत. त्यांनी जवळपास २५० दिवस समुद्रात घालवले आहेत. नेव्ही टाईम्स आणि स्टार्स अँड स्ट्रीप्सने याला थकवणारी तैनाती असं म्हटलं आहे. अब्राहम लिंकन हे मे महिन्यात परत येण्याची शक्यता होती. मात्र इराणसोबतचे युद्ध अजून जास्त काळ ताणलं गेलं त्यामुळं या एअरक्राफ्ट कॅरिअरला याच भागात रहावं लागलं.

Sailors Jump USS Abraham Lincoln
US-Iran War: युद्ध पुन्हा पेटलं! इराणचे कतार, संयुक्त अरब अमिराती आणि बहरीनवर मोठे हल्ले

नौदलानं विश्वास घात केला?

द गार्डियनन आणि द हिल यांनी दिलेल्या माहितीनुसार जहाजावरून समुद्रात उडी मारण्याची ही एकमेव घटना नाहीये तर अशा अनेक घटना गेल्या काही दिवसात घडल्या आहेत. मात्र क्रू मेंबर्सनी या नाविकांना थांबवण्यात यश मिळवलं आहे. काही नाविकांच्या कुटुंबांनी देखील त्यांचे ते नातेवाईक युएएस अब्राहम लिंकनवर तैनात आहेत त्यांना स्वतःचे जीवन संपवण्यासारखे टोकाचे विचार येत आहेत असं सांगितलं.

Sailors Jump USS Abraham Lincoln
Iran War: युद्ध करार मोडला? इराणकडून कुवेत आणि बहरीनमधील अमेरिकन तळांवर क्षेपणास्त्र हल्ले; US ड्रोन पाडल्याचा दावा

क्रू मेंबर टोकाचा निर्णय घेण्याच्या तयारीत?

सॅन डिएगो येथील टाऊन हॉल मिटिंगमध्ये जवळपास क्रू मेंबरचे २०० कुटुंबीय उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी थेट नौदलाच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. यात नेव्ही सचिव ह्युंग काओ आणि वरिष्ठ नेव्हर कमांडर्सचा देखील समावेश होता. एका क्रू मेंबरच्या पत्नीने सांगितलं की तिच्या पतीने त्यांना 'आशा आहे मला उद्या सकाळी जागच येऊ नये.' असा टेक्स्ट केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news