US-Iran War: युद्ध पुन्हा पेटलं! इराणचे कतार, संयुक्त अरब अमिराती आणि बहरीनवर मोठे हल्ले

इराणने कतार, संयुक्त अरब अमिराती (युएई) आणि बहरीनवर हल्ले सुरू केले आहेत.
US-Iran War
US-Iran Warfile photo
Published on
Updated on

US-Iran War:

दोहा: इराणने कतार, संयुक्त अरब अमिराती (युएई) आणि बहरीनवर हल्ले सुरू केले आहेत. इराणकडून लागोपाठ दोनवेळा क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागण्यात आल्यामुळे कतारची राजधानी दोहा शहरात प्रचंड स्फोट झाले असून संपूर्ण परिसर हादरला आहे. दरम्यान, युएई आणि बहरीनच्या हवाई संरक्षण यंत्रणांनी इराणचे हल्ले परतावून लावण्यास सुरुवात केली आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीतील इराणच्या आक्रमक कारवायांना प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने इराणवर हवाई हल्ले केल्यानंतर काही तासांतच इराणने हा मोठा प्रतिहल्ला केला आहे.

राजधानी दोहा क्षेपणास्त्रांच्या स्फोटांनी हादरली

रविवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या या हल्ल्यांमुळे दोहा शहर प्रचंड आवाजांनी हादरून गेले. इराणने डागलेली बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे कतारच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हवेतच नष्ट केली, ज्यामुळे हवेतच मोठे स्फोट झाले. कतारच्या संरक्षण मंत्रालयाने अधिकृत निवेदन जारी करून याबाबत माहिती दिली आहे. "कतारचे सशस्त्र दल देशाच्या दिशेने येणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे निकामी करत असून परिस्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून आहे," असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.

US-Iran War
Bahamas Plane Crash | बहामासमध्ये विमान कोसळले; १० ठार

नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन

स्थानिक वेळेनुसार पहाटे ५:३६ वाजता दोहामधील नागरिकांच्या मोबाईल फोनवर हवाई हल्ल्यांचे इशारे देणारे सायरन वाजले. कतारच्या अंतर्गत व्यवहार मंत्रालयाने देशातील सुरक्षा धोक्याची पातळी उच्च असल्याचे जाहीर केले असून, सर्व नागरिकांना आपापल्या घरात किंवा सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचे आवाहन केले आहे. भीषण स्फोटांमुळे संपूर्ण दोहा शहरात भीतीचे वातावरण आहे.

युएई आणि बहरीनमध्येही युद्धजन्य परिस्थिती

कतारसोबतच इराणने संयुक्त अरब अमिराती (युएई) आणि बहरीनलाही लक्ष्य केले आहे. युएईने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या हवाई संरक्षण यंत्रणा सध्या इराणकडून येणारी क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हवेतच नष्ट करत आहेत. युएई सरकारनेही आपल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. अमेरिकेने इराणमधील लष्करी तळांवर केलेल्या कारवाईनंतर इराणने थेट आखाती देशांवर मोर्चा वळवल्यामुळे या भागात आता थेट युद्ध सुरू होण्याची भीती निर्माण झाली आहे.

US-Iran War
Mojtaba Khamenei : "सर्व शहीदांच्या रक्ताचा बदला घेणार" ; इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनींनी घेतली शपथ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news