Russian Aircraft Crash: रशियन लष्करी विमानाचा भीषण अपघात; आकाशातच आग अन् स्फोट, सर्व १९ जणांचा मृत्यू

रशियाच्या सायबेरियातील केमेरोवो भागात 'एएन-१२' हे लष्करी मालवाहू विमान कोसळले. या अपघातात विमानात असलेले सर्व १९ जण ठार झाले आहेत.
Russian Aircraft
Russian Aircraft File Photo
Published on: 
Updated on: 

Russian Aircraft Crash

सायबेरिया: रशियाच्या सायबेरियातील केमेरोवो भागात 'एएन-१२' हे लष्करी मालवाहू विमान कोसळले. या अपघातात विमानात असलेले सर्व १९ जण ठार झाले आहेत, अशी माहिती रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी (दि. १७) रात्री दिली.

हे विमान 'अँटोनोव्ह एएन-१२' प्रकारचे लष्करी मालवाहू विमान असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. ते केमेरोवो या प्रादेशिक राजधानीजवळ असलेल्या 'यागुनोवो' गावाजवळ कोसळले. केमेरोवोचे गव्हर्नर इल्या सेरेड्युक यांनी यागुनोवो भागात विमान अपघात झाल्याची पुष्टी केली. त्यांनी सांगितले की, ते स्वतः घटनास्थळाकडे निघाले असून, तिथे आपत्कालीन सेवा पथके आधीच तैनात करण्यात आली आहेत.

Russian Aircraft
Sheikh Hasina: "भारत आमच्यावर अटी लादू शकत नाही"; शेख हसीनांच्या प्रत्यार्पणाबाबत बांगलादेशचा इशारा

मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान नोवोसिबिर्स्कपासून क्रास्नोयार्स्क प्रदेशातील कान्स्क शहराच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला. अपघाताच्या नेमक्या क्षणी काय घडले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. रशियन माध्यमांनी प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने म्हटले आहे की, विमान खाली कोसळण्यापूर्वी त्याला आग लागली होती आणि जमिनीवर आदळल्यानंतर त्याचा स्फोट झाला.

घटनास्थळी आपत्कालीन पथके, पोलीस, वैद्यकीय पथके आणि नॅशनल गार्डचे जवान तैनात करण्यात आले आहेत. बचाव कार्याचे समन्वय साधण्यासाठी एक आपत्कालीन नियंत्रण कक्षही स्थापन करण्यात आला आहे. अद्याप रशियन संरक्षण मंत्रालयाने विमानाची ओळख पटवणारे किंवा मृतांच्या संख्येला अधिकृत दुजोरा देणारे कोणतेही निवेदन जारी केलेले नव्हते.

अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. काही वृत्तांमध्ये तांत्रिक बिघाडाची शक्यता वर्तवण्यात आली असली, तरी अधिकृत यंत्रणांनी अद्याप कोणत्याही कारणाची पुष्टी केलेली नाही. तपासकर्ते आता विमानाची स्थिती आणि अपघाताशी संबंधित इतर परिस्थितीची पाहणी करतील.

'अँटोनोव्ह एएन-१२' हे सोव्हिएत युनियनच्या काळात १९५० च्या दशकात विकसित केलेले, चार इंजिन असलेले टर्बोप्रॉप मालवाहू विमान आहे. याचा वापर प्रामुख्याने लष्करी कर्मचारी, उपकरणे आणि मालवाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो.

Russian Aircraft
Jensen Huang: जेन्सन हुआंग यांच्यासाठी एनव्हिडियाचे दरवाजे कायमचे बंद? संचालक मंडळाने घेतला मोठा निर्णय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.